लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बीएसएनएलचा कंत्राटदार आणि टिप्परचालकाच्या निष्काळजीपणामुळे लकडगंजमध्ये भीषण अपघात घडून एका दुचाकीचालकाचा करुण अंत झाला. प्रशांत धर्माजी सोनटक्के (वय ४७) असे मृतकाचे नाव असून, ते गिट्टीखदानमधील कृष्णनगरात राहत होते.सोनटक्के त्यांच्या दुचाकीने सोमवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास लकडगंजमध्ये आले होते. कामाच्या निमित्ताने ते टेलिफोन एक्सचेंज चौकातून जात होते. सेंट्रल एव्हेन्यू, देना बँकेसमोर बीएसएनएलच्या कंत्राटदाराने खोदकाम करून मातीचे ढिगारे जमवून ठेवले आहे. तेथून जात असताना सोनटक्के यांची अॅक्टिव्हा घसरली. त्यामुळे सोनटक्के खाली पडले. त्याचवेळी वेगात आलेला टिप्पर (एमएच ३१/ ईएन ०७४४)च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून सोनटक्के यांना चिरडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. जमावाने टिप्परचालकावर धाव घेतली. माहिती कळताच लकडगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला शांत केले. मृतदेह मेयोत पाठविण्यात आला. आरोपी टिप्परचालक रोहित संजय समुद्रे (वय २७, रा. मानेवाडा) तसेच बीएसएनएलच्या कंत्राटदाराविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. समुद्रेला अटक करण्यात आली.दुचाकीवरून पडून महिला ठारधावत्या दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या शशिकला सुरेश जगदीश (वय ४८) या महिलेचा करुण अंत झाला. शशिकला पिपळा फाटा येथील रहिवासी होत्या. १८ एप्रिलला सकाळी ७.२० वाजता त्या नातेवाईकाच्या दुचाकीवर मागे बसून सक्करदरा चौकाकडे जात होत्या. पिपळा फाटा नाल्याजवळ दुचाकी उसळल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले आणि त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी ६.१५ वाजता डॉक्टरांनी शशिकला यांना मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.वर्धेतील वृद्धाचा अपघाती मृत्यूवर्धा येथील रामनगरात राहणारे जानराव छन्नोजी लोणकर (वय ७५) यांचा नागपुरात अपघाती मृत्यू झाला. रविवारी रात्री७.२० च्या सुमारास लोणकर एमआयडीसीतील आयसी चौकाजवळच्या मार्गावरील पुलावर जखमी अवस्थेत आढळले होते. त्यांनाउपचाराकरिता लता मंगेशकर हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केले. वैभव नंदकिशोर भिलकर (वय २४) यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. लोणकर तेथे कसे पोहोचले, त्यांचा अपघात कशामुळे झाला, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.
नागपुरात टिप्परने दुचाकीचालकाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 1:10 AM
बीएसएनएलचा कंत्राटदार आणि टिप्परचालकाच्या निष्काळजीपणामुळे लकडगंजमध्ये भीषण अपघात घडून एका दुचाकीचालकाचा करुण अंत झाला.
ठळक मुद्देसेंट्रल एव्हेन्यूवर भीषण अपघात : टिप्परचालक, बीएसएनएल कंत्राटदारावर गुन्हा दाखल