लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थव्यवस्थेतील कोंडी आणि कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे संपूर्ण देशात केंद्र सरकारचा कर महसूल कमी होत असतानाही नागपूर विभागात प्रत्यक्ष कर संकलनात ३५ टक्के वाढ झाली आहे.प्रत्यक्ष करांमध्ये कॉर्पोरेट कर आणि वैयक्तिक किंवा वैयक्तिक आयकर समाविष्ट आहे. नागपूर आयकर आयुक्तालयांतर्गत महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभागाचा समावेश होतो. या विभागात आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये कॉर्पोरेट कर १६४४ कोटी १० लाख आणि आयकर ३६६८ कोटी ५० लाख रुपये गोळा झाला होता. अशा प्रकारे संपूर्ण क्षेत्रात ५३१२ कोटी ६० लाख रुपये प्रत्यक्ष कर जमा झाला होता. मागील वर्षात प्रत्यक्ष कर ३९३१ कोटी ८० लाख रुपये जमा झाला होता. त्या तुलनेत ही वाढ देशातील सर्वाधिक म्हणजेच ३५.१० टक्के आहे.नागपूर विभागानंतर पटणा ३ टक्के, लखनौ २.९० टक्के, अहमदाबाद १.८० टक्के, हैदराबाद १.६० टक्के आणि पुणे विभागात ०.८० टक्के वाढीसह प्रत्यक्ष कर जमा झाला आहे. प्रत्यक्ष करात घट झालेल्या विभागांमध्ये कानपूर १८.८० टक्के, जयपूर ११.२० टक्के, भुवनेश्वर १२.५० टक्के, दिल्ली ७.५० टक्के, कोलकाता ६.४० टक्के, मुंबई ५ टक्के, बेंगळुरू ४.९० टक्के आदींचा समावेश आहे.
प्रत्यक्ष कर कलेक्शनमध्ये नागपूर देशात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:20 AM
अर्थव्यवस्थेतील कोंडी आणि कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे संपूर्ण देशात केंद्र सरकारचा कर महसूल कमी होत असतानाही नागपूर विभागात प्रत्यक्ष कर संकलनात ३५ टक्के वाढ झाली आहे.
ठळक मुद्देआर्थिक मंदीनंतरही कलेक्शन वाढले३५ टक्के वाढ