शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

शौचालय स्पर्धेत विदर्भातून नागपूर अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:09 PM

केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन केले होते. ३१ जानेवारी ही या स्पर्धेची अंतिम तारीख होती. स्पर्धेमध्ये नागपूर जिल्ह्यातील १ लाख ७० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामुळे नागपूर जिल्हा विदर्भातून अव्वल ठरला आहे.

ठळक मुद्दे१ लाख ७० हजार शौचालय स्वच्छ आणि सुंदर : राज्यात नागपूर पाचवे

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन केले होते. ३१ जानेवारी ही या स्पर्धेची अंतिम तारीख होती. स्पर्धेमध्ये नागपूर जिल्ह्यातील १ लाख ७० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामुळे नागपूर जिल्हा विदर्भातून अव्वल ठरला आहे.आपले शौचालय स्वच्छ सुंदर दिसावे व शौचालयाप्रती अभिमानास्पद स्वामित्व भावना वाटावी आणि स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात यासाठी देशपातळीवर ग्रामीण भागात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील ७७६ ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्र्धेत प्रत्येक कुटुंबाने स्वनिधीतून शौचालयांची रंगरंगोटी करणे, त्यावर स्वच्छतेचे संदेश लिहणे गरजेचे होते. ही स्पर्धा ग्रामीण भागात स्वच्छतेची जनजागृती करण्यासोबतच त्याचा नियमित वापर करण्यासाठी प्रेरणा देणारी होती. या स्पर्धेत उत्कृष्ट शौचालयांची निवड करून सुमारे चार हजार पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे ३४ जिल्ह्यांतून नागपूर जिल्हा हा पाचव्या क्रमांकावर राहिला. तर ४.१९ लाख शौचालयांची रंगरंगोटी करून कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रक्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सातारा, तिसºया क्रमांकावर जळगाव, चौथ्या क्रमांकावर सोलापूर व पाचव्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे.या स्पर्धेतून राज्यातील उत्कृष्ट तीन जिल्हे निवडले जातील. त्यांनतर संबंधित तिन्ही जिल्ह्यातील पाच उत्कृष्ट रंगविलेल्या शौचालयांची निवड केली जाणार आहे. या अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या राज्यांचे, जिल्ह्यांचे व कुटुंबांची निवड राष्ट्रीय स्तरावर पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने गठित केलेल्या समितीकडून होणार आहे. प्रत्येक ग्रा.पं.मधील पाच उत्कृष्ट रंगविलेल्या शौचालयांची निवड होऊन त्यांना बक्षीस व प्रमाणपत्रे दिली जाणार आहे. त्याच प्रमाणे, जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर या स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींची निवड होऊन त्यांना बक्षीस व प्रमाणपत्र दिली जाणार आहे. तर जिल्हास्तरावर या स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन तालुक्यांनासुध्दा बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.जिल्हानिहाय रंगविलेले शौचालयजिल्हा          स्पर्धकनागपूर        १,७०,३६४भंडारा        २७,३३०वाशिम       ९५७७वर्धा             ६२०३अमरावती   ४७१४चंद्रपूर       २९७४बुलडाणा    २१५९यवतमाळ   २०९३गोंदिया      १५०८अकोला      १४७७गडचिरोली  ३३४

टॅग्स :nagpurनागपूर