शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

नागपूरची राशी विदर्भात टॉप

By admin | Published: May 26, 2016 2:45 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

बारावीत यंदाही मुलींची बाजी : अकोल्याची गरिमा दुसरी तर नागपूरची भारती तिसरीनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात नागपूरच्या एमकेएच संचेती पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राशी महाजन हिने ९७.८५ टक्के (६३६) गुण प्राप्त करीत विदर्भात पहिले स्थान पटकाविले आहे. अकोला येथील नाके गोखले कनिष्ठ महाविद्यालयाची गरिमा वर्मा ९७.२३ टक्के गुण प्राप्त करीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी भारती बजाज हिने ९६.९२ टक्के (६३०) गुण प्राप्त करीत तिसरे स्थान पटकाविले. वाणिज्य शाखेतून हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थिनी कृतिका बदानी हिने ९५.२२ टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला आहे तर कला शाखेतून एलएडी महाविद्यालयाची रितिका श्रीवास्तव हिने ९६.६ टक्के (६२८) गुण मिळवीत ‘टॉप’ केले.नागपूर विभागाचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल यंदा कमी लागला आहे. विभागाने राज्यात पाचवे स्थान मिळविले. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८६.३५ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ५.७६ टक्क्यांची घट झाली आहे. विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७७ हजार ६८६ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यातील ६९ हजार २५० उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.१४ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ८३.५७ टक्के इतके आहे. सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांनी निकालाची घोषणा केली. नागपूर विभागात एकूण १ लाख ५५ हजार ७२८ पैकी १ लाख ३४ हजार ४७३ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.वर्धा जिल्ह्यातून मुलींनी बाजी मारली. जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला. स्वराली विलास घोडखांडे ही विज्ञाननागपूरची राशी विदर्भात टॉप शाखेतून ६२४ (९६ टक्के) गुण घेत जिल्ह्यातून अव्वल आली आहे. प्रियाली संजय गाठे ही विज्ञान शाखेतून ६११ (९४ टक्के) गुण घेत दुसऱ्या स्थानावर तर कल्याणी ज्ञानेश्वर लोणकर ही वाणिज्य शाखेतून ६१० (९३.८४ टक्के) गुण घेत तिसऱ्या स्थानावर आहे. गोंदिया - नागपूर विभागीय मंडळात गोंदियाने तिसरे स्थान पटकावले आहे. अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी किशोर काळबांधे याने ९३.६९ टक्के गुण पटकावून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. यासोबतच गोंदिया एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित डी.बी. सायन्स कॉलेजची भाग्यश्री बिसेन हिने ९३.५४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय तर याच महाविद्यालयाचा आकाश कोतवाल याने ९२.९२ गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय स्थान पटकावले आहे.भंडारा- साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयाची भुमेश्वरी केशव गहाणे ही विद्यार्थिनी ९२.३० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम आली आहे. भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी केतकी संजय पदवाड आणि जे.एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी राज रोशन कटकवार ९१.८४ टक्के (५९७ गुण) घेऊन जिल्ह्यातून संयुक्तपणे द्वितीय आले. लालबहादूर शास्त्री विद्यालयाची रक्षंदा कोल्हेकर ९१.६५ टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. गडचिरोली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.७१ टक्के लागला असून सर्वाधिक ८९.७२ टक्के निकाल एटापल्ली तालुक्याचा आहे. जिल्ह्यात सहा शाळांचा निकाल १०० टक्के असून शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोलीचा सौरभ अविनाश तुरे हा ९२.४६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिला आला आहे. जिल्ह्यात सरासरी निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण जास्त आहे. चंद्रपूर - मातोश्री उच्च माध्यमिक विद्यालय, चंद्रपूरचे केतन रवींद्र खनके व रक्षित ठवरे हे दोघे ९४.१५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आले आहेत. दुसऱ्या स्थानावर जनता महाविद्यालयाची धनश्री निखाते ही असून तिला ९४.०३ टक्के गुण मिळाले आहेत.अमरावती विभागाचा निकाल अमरावती विभागाचा निकाल ८५.८१ टक्के लागला आहे. गतवर्षी बारावीचा निकाल ९२.५० टक्के लागला होता. यंदा तो सात टक्क्यांनी घसरला आहे. बुुलडाणा जिल्हा आघाडीवर असून यवतमाळ जिल्हा माघारला आहे. बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ८७.८९ टक्के लागला असून अकोला जिल्ह्याने ८७.२३ टक्क्यांसह विभागात दुसरे स्थान पटकावले आहे. वाशिम जिल्ह्याचा निकाल ८५.८१ टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील महेश विद्यामंदिरचा विद्यार्थी तरुण गट्टाणी हा ९६.७६ टक्के गुण घेत जिल्ह्यातून प्रथम आला तर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील जि.प. कनिष्ठ महाविद्यालयाची आकांक्षा मोरे ९५.६९ टक्के गुण मिळवीत पहिल्या क्रमांकावर आहे.अमरावती विभागातून १ हजार ४१३ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख ३१ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख १२ हजार ९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम श्रेणीत ७५ टक्क्यांहून अधिक म्हणजे ८,८५५ विद्यार्थी, ६० टक्क्यांच्या पुढे ५०,०१९, ४५ टक्क्यांपेक्षा अधिक ५१,४६३ आणि ३५ टक्क्यांहून अधिक गुण घेऊन २५६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अमरावती ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य मेहकरे याने ९६.६१ टक्के गुण प्राप्त करून अमरावती जिल्ह्यातून अव्वल स्थान मिळविले आहे. आदित्य हा अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मूळ रहिवासी आहे. तो स्थानिक नवाथेनगरात भाड्याच्या खोलीत राहतो. आदित्यने जेईई अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याच महाविद्यालयातील वैष्णवी शांतिलाल कलंत्री हिने ९६.३० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याच महाविद्यालयातील हार्दिका प्रमोद रहाटे हिने ९६ टक्के गुणांसह जिल्ह्यातून तृतीय येण्याचा मान मिळविला. उपरोक्त तीनही विद्यार्थी विज्ञान शाखेचे आहेत. यवतमाळ जिल्ह्यातून यवतमाळच्या अ‍ॅग्लो हिंदी विद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी मोहित विठ्ठलानी हा ९३ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आला आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९४.१५ टक्के, कला शाखा ७६.०७ टक्के, वाणिज्य शाखा ९०.४५ टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ७२.२५ टक्के लागला आहे. मोहित जयंतीलाल विठ्ठलानी हा ६५० पैकी ६०५ गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी ९३ आहे. याच विद्यालयाचा विद्यार्थी जसवंतसिंग पवार ९२ टक्के गुण घेऊन दुसरा तर जयंत नरेंद्र भुसकट हा ९१.६९ टक्के गुण घेऊन तृतीय आला. येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी लीना शंकर तलवार ही वाणिज्य शाखेत जिल्ह्यात अव्वल आली आहे. तिला ६५० पैकी ६०७ म्हणजे ९३.३८ टक्के गुण मिळाले आहे.