लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी सकाळी शांतिनगर परिसरातील दही बाजार पुलाजवळ एका अनियंत्रित वाहनाने चार वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले. अवनीश अमोल मदनकर रा. शांतिनगर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मागील सहा दिवसात रस्ते अपघातात नऊ लोकांचा जीव गेला. यात तीन चिमुकल्यांचाही समावेश आहे. या अपघातांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.अवनीशचे वडील अमोल मदनकर हे दाल मिलमध्ये सुपरवायजर आहेत. अमोल पत्नी प्रियंका आणि मुलासोबत राहतात. प्रियंका कोचिंग क्लासमध्ये काम करते. अवनीश नर्सरीमध्ये शिकत होता. नुकतीच आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अमोलने आरटीईसाठी अर्ज केला होता. यासाठी त्याला स्वत:चे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि मुलाचे आधर कार्ड बनवाचे होते. अमोलने आज ड्युटीवरून सुटी घेतली होती. तो अॅक्टिव्हाने अवनीशसोबत उत्पन्नाचे प्रमाणपत्र व आधार कार्ड बनवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होता. सकाळी ११ वाजता अमोल इतवारी स्टेशन मार्गाकडूनदही बाजार पूल पार करीत होता. अमोलला मारवाडी चौकाकडे जायचे होते. दही बाजार टी पॉर्इंटजवळ मागून आलेल्या टाटा यस वाहनाने (एम.एच./ ४०/ वाय/ २३३२) अॅक्टिव्हाला कट मारली. कट लागल्याने अमोलचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अवनीश अॅक्टिव्हावरून पडला आणि टाटा यस गाडीखाली आला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. नागरिकांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला. त्यांचे म्हणणे होते की, पोलीस वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी लपून वसुली करीत असतात. नागरिकांच्यानुसार टी पॉर्इंटवर वाहतूक पोलीस कधीच तैनात नसतात. वरिष्ठ अधिकाºयांकडेही याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु काहीही कारवाई झाली नाही. दही बाजार पुलावर अपघाताचे धोके वाढले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी यादृष्टीने पाऊल उचलावे, अशी मागणी करण्यात आली होती. शांतिनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विनोद कोवे, माजी नगरसेवक रवी डोळस, सुनील बारापात्रे, अमोल वांद्रे, संजय मारोडे, प्रशांत रेवतकर, हर्षल शेंडे, रोशन कावळे, कुणाल वंजारी, कैलाश पुरके, सचिन मुटकुरे, पिंटू उकिनकर, बाबा रंगारी आणि प्रणव मांजीकर यांनी दही बाजार पुलावर वाहतूक पोलीस तैनात करण्याची आणि अवनीशच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.शांतिनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून आरोपी चालक जावेंद्र येडे (४०) रा. मां अंबेनगर पारडी याला अटक केली.गेल्या सहा दिवसात नऊ लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. यात तीन चिमुकल्यांचाही समावेश आहे. मंगळवारी सयंकाळी वर्धा रोडवर स्नेहनगर बस स्टॉपजवळ एसटी बसमध्ये सापडून दीड वर्षाचा मुलगा उत्कर्ष ऊर्फ साई नागराज गोल्हर याचा मृत्यू झाला. सेलू वर्धा येथील रहिवासी गोल्हर परिवार मंगळवारीच नागपूरला आला होता. उत्कर्ष त्याची आई, बहीण आणि आजीसोबत नागपूरला आला होता. सायंकाळी ६.१५ वाजता सर्व सेलूला परत जाण्यासाठी बस स्टॅँडवर आले. ते एसटीची वाट पाहत होते. त्यापूर्वी ९ फेब्रुवारी रोजी यशोधरानगर येथील गरीबनवाजनगर येथे अनियंत्रित पिकअॅप वाहनाने तीन वर्षाची चिमुकली अलिस्मा अमरीनला तिच्या घरासमोरच चिरडले होते.पोलीस बनवित होते चालानस्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात झाला त्यावेळी दही बाजार पुलाजवळून थोड्या दूर अंतरावर वाहतूक पोलीस चालान बनवण्यात व्यस्त होते. त्यांच्यापासून वाचण्याच्या उद्देशानेच हा अपघात झाल्याचाही संशय वर्तविण्यात येत आहे. नागरिक संतप्त झाल्याचे समजताच वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले.आई-वडिलांचे स्वप्न भंगलेएकुलत्या एक मुलाला अपघातात गमावलेल्या मदनकर दाम्पत्याला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. विनोद आणि प्रियंका अवनीशला शाळेत पाठवण्याचे स्वप्न रंगविले होते. प्रियंकाने अवनीशला फोटो काढण्याच्या बहाण्याने पतीसोबत पाठवले होते. आईची गोष्ट ऐकून तो हसतखेळत घरातून निघाला होता. अवनीश मृतावस्थेत परतेल असे कुणालाही वाटले नव्हते. अमोल समोरच हा अपघात घडल्याने तो प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. वस्तीतही शोक पसरला आहे.इनोवाने वृद्धास चिरडलेजामठा येथे इनोव्हाचालकाने अॅक्टिव्हा चालक वृद्धाला चिरडले. सहारा सिटी येथील रहिवासी असलेले ६० वर्षीय जयंत दिवाकर पेठकर सोमवारी सायंकाळी अॅक्टिव्हाने जात होते. जामठाजवळ इनोव्हा क्रमांक एम.एच. /०९/बी.एक्स./००७० च्या चालकाने अॅक्टिव्हाला धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नागपुरात अनियंत्रित वाहनाने चार वर्षाच्या चिमुकल्यास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:08 PM
शहरात रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी सकाळी शांतिनगर परिसरातील दही बाजार पुलाजवळ एका अनियंत्रित वाहनाने चार वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले. अवनीश अमोल मदनकर रा. शांतिनगर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मागील सहा दिवसात रस्ते अपघातात नऊ लोकांचा जीव गेला. यात तीन चिमुकल्यांचाही समावेश आहे. या अपघातांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
ठळक मुद्देदही बाजार पुलावरील घटना : सहा दिवसात नऊ जणांचा मृत्यू, तीन चिमुकल्यांचा समावेश