शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

नागपूर विद्यापीठ : कुलसचिवपदाची घोषणा आज होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:50 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. गुरुवार किंवा शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देअद्यापही नावे बंद लिफाफ्यातच

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्याकुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. बुधवारी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे बैठकीसाठी मुंबईला गेले होते. त्यामुळे ते परत आल्यानंतर गुरुवार किंवा शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.नियोजित वेळापत्रकानुसार शनिवारी कुलसचिवपदासाठी तर रविवारी परीक्षा व मूल्यमापन विभाग संचालकपदासाठी मुलाखती झाल्या. दोन्ही मुलाखतींसाठी वेगवेगळी निवड समिती होती व दोन्ही समितींनी योग्य उमेदवाराच्या नावावर मोहरदेखील लावली. या मुलाखतीनंतर लगेच घोषणा होणे अपेक्षित होते. परंतु कुलसचिवपदाच्या निवडीवरुन राजकारण आडवे आले. त्यामुळे बुधवारी रात्री उशिरापर्यंतदेखील घोषणा झाली नव्हती.यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांना विचारणा केली असता नावांची घोषणा कुलगुरूच करतील हे त्यांनी स्पष्ट केले. कुणाची निवड झाली आहे हे मला सांगता येणार नाही. रविवारी मुलाखती आटोपल्या. सोमवारी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करायची होती. मंगळवारी सुटी आली. त्यानंतर बुधवारी नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंची मुंबईत बैठक बोलाविली होती. त्यासाठी डॉ.काणे मुंबईला गेले. त्यामुळे बुधवारीदेखील नावाची घोषणा झाली नाही. गुरुवारी किंवा शुक्रवारी घोषणा होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.कुलसचिव पदासाठी ३२ उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यानंतर अर्जाची छाननी करुन २३ उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले. यापैकी सातच उमेदवारांनी हजेरी लावली. यात प्रभारी कुलसचिव व ‘एलआयटी’चे प्रोफेसर डॉ. नीरज खटी, विद्वत् परिषदेचे सदस्य डॉ. संजय दुधे, डॉ. चौधरी, डॉ.दोंतुलवार, डॉ.नंदनवार यांचा प्रामुख्याने समावेश होता. तर रविवारी झालेल्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालकांच्या निवडीसाठी दहा उमेदवार यासाठी पात्र होते. यात डॉ. बी.आर.महाजन, डॉ.अनिल हिरेखण, डॉ.पी.एम.साबळे, डॉ.एस.व्ही.दडवे, डॉ.ए.जे.लोबो, डॉ.ए.एम.धापडे, डॉ.फुलारी, डॉ.आर.के.ठोंबरे यांचा प्रामुख्याने समावेश होता.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठRegistrarकुलसचिव