शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

नागपूर विद्यापीठ : युजीसीच्या नावाने बोगस परिपत्रक व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 12:48 AM

Bogus circular goes viral in the name of UGC राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून कुठल्याही अभ्यासक्रमाची परीक्षा रद्द करण्यात येणार नाही, असे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नावाने परीक्षांसंदर्भात बोगस परिपत्रक व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देपरीक्षा रद्द होणार नसल्याची स्पष्टोक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून कुठल्याही अभ्यासक्रमाची परीक्षा रद्द करण्यात येणार नाही, असे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नावाने परीक्षांसंदर्भात बोगस परिपत्रक व्हायरल होत आहे. यानुसार युजीसीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील सर्व विद्यापीठांना परीक्षा रद्द करण्याचे निर्देश दिल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु परीक्षा व मूल्यमापन संचालकांनी याबाबत विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या लेटरहेड यात दिसत असल्याने विद्यार्थ्यांनी यावर विश्वास ठेवला होता. महाविद्यालयांना देखील याबाबत विचारणा होत होती. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क केल्यानंतर खरी बाब समोर आली. संबंधित परिपत्रक व व्हायरल पोस्ट चुकीची आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. विद्यापीठाच्या परीक्षा होतीलच, असे त्यांनी स्पष्ट केले.

आयोगाने दिला कारवाईचा इशारा

संबंधित पोस्टमध्ये परिपत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या लेटरहेडवर असल्यामुळे त्याची चाचपणी करण्यात आली. तेव्हा खरी बाब समोर आली. आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी एक सूचना जारी केली आहे. संबंधित परिपत्रक फेक असल्याचे त्यांनीदेखील सांगितले. आयोगाने असा कुठलाही निर्णय घेतला नसून दिशानिर्देश जारी करण्यात आलेले नाहीत. लेटरहेडच्या माध्यमातून फेक पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ