शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

नागपूर विद्यापीठ ; कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी अद्यापही मुहूर्त नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:02 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास पावणेदोन महिने उरले आहेत. परंतु अद्यापही कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी राज्यपाल कार्यालयातर्फे पुढाकार घेण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देपावणेदोन महिन्यानंतर कारभार कुणाकडे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास पावणेदोन महिने उरले आहेत. परंतु अद्यापही कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी राज्यपाल कार्यालयातर्फे पुढाकार घेण्यात आलेला नाही. निवड समिती घोषित करण्यासाठी विलंब का होत आहे, हे एक कोडेच आहे. दरम्यान, पावणेदोन महिन्यानंतर विद्यापीठाचा कारभार कुणाकडे जाणार, यासंदर्भात विविध तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली आहे.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होतो आहे. त्याअगोदर नवीन कुलगुरूंची निवड होणे अपेक्षित आहे. परंतु सद्यस्थितीत निवड समितीचीच घोषणा झालेली नाही. त्यामुळे पूर्णवेळ कुलगुरू या कालावधीत मिळणे अशक्यप्राय बाब आहे.साधारणपणे कुलपती कार्यालयाकडून नवीन कुलगुरू नियुक्तीकरिता निवड समिती स्थापन करणे, जाहिरात देणे व अर्ज मागवून त्यातील पहिल्या पाच जणांची निवड करण्याची प्रक्रिया काही आठवड्यांअगोदरच सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, निवड समितीच स्थापन झाली नसल्याने पुढील प्रक्रिया कधी होईल, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.६ एप्रिलपर्यंत नवीन कुलगुरूंची निवड होणे अशक्य आहे. त्यामुळे त्यानंतर कुलगुरूपदाची प्रभारी जबाबदारी कुणाकडे सोपविली जाणार, हा मोठा प्रश्न आहे. विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकाकडे हा कार्यभार जाण्याची शक्यता आहे.समिती सदस्याचे नाव डिसेंबरमध्येच ठरलेकुलगुरू निवड समितीतील एका सदस्यासाठी विद्यापीठातील विद्वत् परिषद आणि व्यवस्थापन परिषदेची संयुक्त बैठक डिसेंबर महिन्यात झाली होती. त्या बैठकीत आयआयटी कानपूर येथील संचालक डॉ. अभय करंदीकर यांची समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला दोन्ही प्राधिकरणांच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. त्यानुसार डॉ. अभय करंदीकर यांच्या नावाचा प्रस्ताव सादर कुलपती कार्यालयाला पाठविण्यात आला. विद्यापीठाकडून समिती सदस्याचे नाव गेल्यानंतर काही दिवसातच समिती अध्यक्ष स्थापन होणे आवश्यक होते. परंतु, असे होऊ शकले नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ