शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नागपूर विद्यापीठ : ‘दीक्षांत’चा मुहूर्त पुढल्या वर्षीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:20 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०६ व्या दीक्षांत समारंभाच्या आयोजनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र वेळेत अतिथी मिळाले नसल्याने तारीख निश्चित झाली नाही.

ठळक मुद्देनोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आयोजन शक्यच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०६ व्या दीक्षांत समारंभाच्या आयोजनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र वेळेत अतिथी मिळाले नसल्याने तारीख निश्चित झाली नाही. तसेच आता विविध तांत्रिक कारणांमुळे विद्यापीठाला थेट पुढील वर्षी जानेवारीतच हा दीक्षांत समारंभ आयोजित करावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाच्या २०१८ च्या उन्हाळी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. फेरमूल्यांकनाचे बहुतांश निकालदेखील जाहीर झाले आहेत. हिवाळी परीक्षा आॅक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. साधारणत: नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर चर्चादेखील झाली. दीक्षांत समारंभाला उद्योगपती रतन टाटा किंवा मुकेश अंबानी यांना बोलविण्याचा मानस कुलगुरूंनी व्यक्त केला होता. यानुसार त्यांच्याशी संपर्कदेखील साधण्यात आला. मात्र दोघांनीही येण्यासाठी असमर्थता दर्शविली. अशा स्थितीत आता बिगर राजकीय मान्यवरांपैकी कुणाला आमंत्रित करावे, याबाबत विद्यापीठात मंथन सुरू आहे.दरम्यान, दीक्षांत समारंभ नेमका कधी होणार याबाबत विद्यापीठ वर्तुळातदेखील प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.परंतु अतिथी ठरले नसल्यामुळे तिथी निश्चित झालेली नाही. तारीख निश्चित झाल्यानंतर राज्यपालांकडून त्यासंदर्भात मान्यता घ्यावी लागते. याला कमीत कमी १५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आयोजन अशक्यच आहे. डिसेंबर महिन्यात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे विदेशात जाणार आहेत. त्यामुळे त्या महिन्यातदेखील आयोजन करता येणार नाही. अशा स्थितीत विद्यापीठाला २०१९ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच दीक्षांत समारंभाचे आयोजन करावे लागणार आहे. याबाबत कुलगुरूंना विचारणा केली असता त्यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला. दोन दिवसात अतिथींची नावे निश्चित होतील. त्यानंतर राज्यपालांच्या मान्यतेला वेळ लागेल. डिसेंबर महिन्यात मी खासगी कामाने अमेरिकेला जाणार असल्याने सुटीवर आहे. अशा स्थितीत आम्ही जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच दीक्षांत समारंभाचे आयोजन करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ