लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. या मुद्यावर बुधवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यात कुठलाही ठोस निर्णय होऊ शकला नाही. २५ जून रोजी सर्व कुलगुरूंची राज्यपालांसमवेत बैठक आहे. यानंतरच अंतिम निर्णय होऊ शकणार असल्याचे सदस्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आले.लॉकडाऊनमुळे जुलै महिन्यात परीक्षा घेण्यात याव्या असे विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येऊ नये यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पत्र पाठविले आहे. काही विद्यापीठांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, नेमकी परीक्षा होईल किंवा नाही याबाबत संभ्रम आहे. नागपूर विद्यापीठाची १ ते ३१ जुलै या कालावधीत परीक्षा घेण्याची तयारी आहे. विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.यासंदर्भातच विद्वत परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर हेदेखील यावेळी सहभागी झाले होते. पुरवणी परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे मत काही सदस्यांनी मांडले. काही अधिष्ठात्यांनीदेखील ही बाजू उचलून धरली. याशिवाय महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेत असताना विद्यापीठाकडे तयार असलेल्या प्रश्नपत्रिकांचा उपयोग करण्यात यावा, अशी सूचना काही सदस्यांनी केली. परीक्षा घेत असताना फिजिकल डिस्टन्सिंग कसे राखणार यावरदेखील चर्चा झाली. २५ जून रोजीच्या बैठकीनंतरच नेमके चित्र स्पष्ट होईल, असे कुलगुरूंनी सर्व सदस्यांना सांगितले.
नागपूर विद्यापीठ : परीक्षेसंदर्भात निर्णय जून अखेरीसच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:42 PM
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. या मुद्यावर बुधवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यात कुठलाही ठोस निर्णय होऊ शकला नाही. २५ जून रोजी सर्व कुलगुरूंची राज्यपालांसमवेत बैठक आहे. यानंतरच अंतिम निर्णय होऊ शकणार असल्याचे सदस्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ठळक मुद्देविद्वत्त परिषदेत मंथन, पुरवणी परीक्षा घेण्याचा सूर