लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासंदर्भातील अनेक वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. बुधवारी अध्यासनाचे उद्घाटन होणार आहे. लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेच्या परिसरात स्वतंत्र इमारतीत स्थापन झालेल्या या अध्यासनाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली असून आर्थिक सहकार्यही केले आहे.नागपूर विद्यापीठात महानुभाव साहित्याचे वाचन, संशोधन व्हावे, वेगवेगळ्या दिशांनी या साहित्यांचा अभ्यास व्हावा, यादृष्टीने महानुभाव पंथाचे जनक श्रीचक्रधर स्वामी यांच्या नावे अध्यासन सुरू करण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. २०१६ साली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नागपूर विद्यापीठात हे अध्यासन सुरू करण्यात येईल व त्याला आर्थिक पाठबळही दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी दोन कोटी रुपयांची विशेष तरतूददेखील करण्यात आली.नागपूर विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळ, विद्यापरिषद तसेच व्यवस्थापन परिषदेनेदेखील अध्यासन स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर अध्यासन उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या. ११ डिसेंबर रोजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे उपस्थित राहणार असून या प्रसंगी महानुभाव साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. लता लांजेवार मार्गदर्शन करणार आहेत. अमरावती मार्गावरील लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था परिसरातील विद्यापीठ कर्मचारी सहकारी संस्थेच्या हा कार्यक्रम होईल, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठ : अखेर चक्रधर स्वामी अध्यासनाचा मुहूर्त ठरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:37 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासंदर्भातील अनेक वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. बुधवारी अध्यासनाचे उद्घाटन होणार आहे.
ठळक मुद्देउद्या उद्घाटन, दीर्घकाळची प्रतिक्षा संपणार