शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

नागपूर विद्यापीठ : अभ्यास मंडळांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:49 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुका २ जुलैपासून होणार आहेत. ५५ अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमातून निवड होणार आहे. विशेष म्हणजे अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसोबतच विद्वत परिषदेच्या स्थापनेची प्रक्रियादेखील पूर्ण होणार आहे. अभ्यास मंडळावर आपले वर्चस्व रहावे यासाठी विविध संघटनांची मोर्चेबांधणी सुरू असून विद्यापीठ वर्तुळात भेटीगाठींचे प्रमाण वाढले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे२ जुलैपासून निवडणुका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुका २ जुलैपासून होणार आहेत. ५५ अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमातून निवड होणार आहे. विशेष म्हणजे अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसोबतच विद्वत परिषदेच्या स्थापनेची प्रक्रियादेखील पूर्ण होणार आहे. अभ्यास मंडळावर आपले वर्चस्व रहावे यासाठी विविध संघटनांची मोर्चेबांधणी सुरू असून विद्यापीठ वर्तुळात भेटीगाठींचे प्रमाण वाढले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नव्या कायद्यानुसार अभ्यास मंडळावर तीन सदस्यांची निवडणुकीने नियुक्ती झाली. तर सहा सदस्य हे कुलगुरूंनी नामित केलेले आहेत. त्यातून एक अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. नागपूर विद्यापीठाने विविध विषयनिहाय निवडणूक वेळापत्रक घोषित केले होते. अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १३ ते २२ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. २४ जून रोजी उमेदवारांची तात्पुरती यादी प्रकाशित झाली. त्यावर अपील करण्याची २५ जूनपर्यंतची मुदत होती व २८ जूनपर्यंत त्यावर कुलगुरूंना अंतिम निर्णय घ्यायचा आहे. तसेच २९ जून रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. ३० जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत दिली आहे. परंतु प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय हे वेळापत्रक वेगळे आहे. प्रत्यक्ष निवडणुका या २ जुलैपासून सुरू होतील व ५ जुलैपर्यंत चालतील. सद्यस्थितीत अभ्यास मंडळांवर नामनिर्देशित झालेल्या सदस्यांमध्ये शिक्षण मंचाचे वर्चस्व आहे. अनेक मंडळांवर ‘सेक्युलर पॅनल’ तर काहींवर ‘यंग टीचर्स असोसिएशन’चे तीन-तीन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. प्रत्येक संघटना यासाठी कामाला लागली आहे. शिक्षण मंचच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तर राजकीय चेहरेदेखील फिरताना दिसून येत आहेत.सद्यस्थितीत शिक्षण मंचचा वरचष्माअभ्यासमंडळावर कुलगुरूंकडून विविध अभ्यासमंडळांवर प्रत्येकी सहा जणांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. जर नामनिर्देशन झालेल्या नावांवर नजर टाकली तर अनेक नावे शिक्षण मंचशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे.कुलगुरूंनी नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार हा विद्यापीठाच्या विभागातील आहे तर उर्वरित जण संलग्नित व संचालित महाविद्यालयातील आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठElectionनिवडणूक