शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

नागपूर विद्यापीठात सहा हजार विद्यार्थ्यांचा कुणीच वाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:22 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या तयारीत व्यस्त आहे. पण यात एक्स्टर्नल व एक वर्षीय डिग्री अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देएक्सटर्नल व एक वर्षाच्या डिग्री अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची घेतली जात नाही दखल

आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या तयारीत व्यस्त आहे. पण यात एक्स्टर्नल व एक वर्षीय डिग्री अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात अजूनही कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सहा हजारावर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात बीए, एमए, एलएलएम, बीए अ‍ॅडिशनल आदी अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे पूर्ण लक्ष अंतिम वर्षाच्या व सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आहे. गेल्या काही दिवसात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत व परीक्षा मंडळाच्या बैठकीत सुद्धा याच विद्यार्थ्यांच्या विषयावर विचार करण्यात आला. बैठकीत एक्सटर्नल व एक वर्षीय डिग्री अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांबाबत कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा भवनातही विचारणा केली परंतु कुठलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा हिवाळी परीक्षेदरम्यान होणाऱ्या परीक्षेसोबत घेण्यात येईल.उच्च शिक्षण मंत्री घेणार परीक्षेचा आढावाऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारी अंतिम वर्षाची व सेमिस्टर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत सोमवारी नागपुरात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात विदर्भातील विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक त्यांनी बोलावली आहे. या बैठकीत ते परीक्षेच्या तयारीचा आढावा घेणार आहे.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ