लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालांची गती यंदादेखील कायम असली तरी विज्ञान शाखेच्या निकालांना काहिसा उशीर झाला आहे. परीक्षा विभागाने ही बाब गंभीरतेने घेतली असून मूल्यांकनात वेळकाढूपणा करणाऱ्या सुमारे ८० हून अधिक प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे जवळपास १ हजार ७८ निकाल जाहीर झाले आहेत. मागील सत्रांप्रमाणे यंदादेखील मूल्यांकनाचा वेग कायम होता. परंतु विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत येणाऱ्या ‘बीएसस्सी’च्या निकालांना काहिसा उशीर झाला. काही प्राध्यापक मूल्यांकनाला नियमित येतच नव्हते अशी बाब परीक्षा विभागाला आढळून आली. असेच राहिले तर हिवाळी परीक्षांमध्ये अडचण येऊ शकते, असा विचार करुन ही बाब कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या कानावर घालण्यात आली. परीक्षेच्या कामाला गंभीरतेने न घेणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात यावी असे निर्देश ‘जेबीव्हीसी’ तसेच पुणे येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आले होते. त्यामुळे डॉ.काणे यांनी या प्राध्याकांना तात्काळ नोटीस बजाविण्याची सूचना केली. त्यानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी नोटीस जारी केली आहे.नव्या कायद्याप्रमाणे दिली नोटीसयासंदर्भात डॉ.खटी यांना विचारणा केली असता सुमारे ७० ते ८० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित नोटीस ही नवीन विद्यापीठ कायद्यानुसार देण्यात आली आहे. त्यामुळे प्राध्यापकांना समाधानकारक उत्तर दिले नाही तर प्रकरण शिस्तपालन समितीकडे न पाठवता थेट कुलगुरूंसमोर प्राध्यापकांना स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे, असे डॉ.खटी यांनी सांगितले.
८० हून अधिक प्राध्यापकांना नागपूर विद्यापीठाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:01 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालांची गती यंदादेखील कायम असली तरी विज्ञान शाखेच्या निकालांना काहिसा उशीर झाला आहे. परीक्षा विभागाने ही बाब गंभीरतेने घेतली असून मूल्यांकनात वेळकाढूपणा करणाऱ्या सुमारे ८० हून अधिक प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
ठळक मुद्देमूल्यांकनात वेळकाढूपणा भोवला : समाधानकारक उत्तर न दिल्यास कुलगुरूंसमोर हजेरी