लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सरकारी सुटी असूनदेखील २१ नोव्हेंबर रोजी परीक्षा ठेवली आहे. ही बाब समोर आल्यानंतर आता वेळापत्रक बदल करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. या दिवशी होणाऱ्या ११० विषयांच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.विद्यापीठाच्या तिसऱ्या टप्प्याच्या परीक्षा या १३ व १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. तर आठवड्याभरानंतरच चौथ्या टप्प्याच्या परीक्षा सुरू होतील. २१ नोव्हेंबर रोजी ईद-ए-मिलादनिमित्त सरकारी सुटी आहे. मात्र नागपूर विद्यापीठाने या दिवशी ११० विषयांच्या परीक्षा ठेवल्या आहेत. साधारणत: सरकारी सुटीच्या दिवशी विद्यापीठात परीक्षा ठेवली जात नाही. त्यामुळे जर २१ नोव्हेंबर रोजीच्या परीक्षा पुढे ढकलल्या तर विद्यार्थ्यांना १० डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.‘कॅलेंडर’ची चुकी असल्याचा दावायासंदर्भात परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले आहे. मात्र ही चूक विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेल्या ‘कॅलेंडर’मुळे झाल्याचा दावा केला आहे. या ‘कॅलेंडर’ला बघून वेळापत्रक तयार करण्यात आले व यात २० नोव्हेंबर रोजी सरकारी सुटी दाखविण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सद्यस्थितीत परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.नीरज खटी हे सुटीवर आहेत. ते परत आल्यानंतरच ठोस निर्णय होऊ शकणार आहे.२० नोव्हेंबर रोजी होऊ शकते परीक्षादरम्यान, २० नोव्हेंबर रोजी परीक्षा घेतल्या जाऊ शकतात का याबाबतदेखील अधिकाऱ्यांचा विचार सुरू आहे. जर असे झाले तर संंबंधित पेपरसाठी विद्यार्थ्यांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर विद्यापीठ : ११० विषयांच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:49 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सरकारी सुटी असूनदेखील २१ नोव्हेंबर रोजी परीक्षा ठेवली आहे. ही बाब समोर आल्यानंतर आता वेळापत्रक बदल करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. या दिवशी होणाऱ्या ११० विषयांच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्देसरकारी सुटीच्या दिवशी ठेवली परीक्षा