शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

नागपूर विद्यापीठ ; माजी सरन्यायाधीशांशिवाय झाला विशेष दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 10:54 AM

Nagpur News सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद एलएलडी ही पदवी प्रदान करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शुक्रवारी विशेष दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे १०८ वा दीक्षांत समारंभदेखील संपन्नदीक्षांत समारंभात ७७ हजार ९१२ विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदवी, २ डी.लिट. तर ८६७ उमेदवारांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद एलएलडी ही पदवी प्रदान करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शुक्रवारी विशेष दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले   नाहीत . त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र श्रीनिवास बोबडे यांनी मानद पदवी व सन्मानचिन्हाचा स्वीकार केला.

नागपूर विद्यापीठातर्फे सुमारे सात दशकांनंतर दीक्षांत सभागृहात विशेष व १०८ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदाच विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय ऑनलाईन समारंभ आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ऑनलाईन माध्यमातून अध्यक्षस्थान भूषविले तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे, कुलसचिव डॉ.राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांच्याशिवाय व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता मंचावर उपस्थित होते. सर्व पदवीधरांनी आयुष्यात प्रामाणिकपणाची कास धरावी. तसेच पालक, गुरु व देशाबाबत श्रद्धा बाळगावी, असे आवाहन राज्यपालांनी केले. विद्यार्थ्यांच्या जीवनातील खरा संघर्ष पदवीनंतर सुरू होत असतो. आयुष्याच्या कुरुक्षेत्रातील खरा शत्रू ओळखून व स्वत:चे दुर्गुण बाजूला सारत संघर्ष केला पाहिजे. संशोधनाचा फायदा देश व समाजाच्या प्रगतीला होतो. त्यामुळे विद्यापीठाने संशोधनावर जास्तीत जास्त भर द्यावा, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.

१,२५६ विद्यार्थ्यांनी पाहिला ऑनलाईन समारंभ

नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांशिवाय दीक्षांत समारंभ पार पडला. इंटरनेटवरील विविध माध्यमांवर दीक्षांत समारंभाचे लाईव्ह प्रसारण झाले. ७७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली. त्यातील १ हजार २५६ विद्यार्थ्यांनी यू-ट्यूबवरील विद्यापीठाच्या चॅनलवर समारंभ पाहिला. तर वेबेक्सवर मोजके विद्यार्थी व पीएचडी उमेदवार सहभागी झाले होते. फेसबुकवर शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ