लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कुलगुरुपदासाठी पात्र उमेदवारांमधून अंतिम पाच जणांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल ७ऑगस्ट रोजी मुलाखती घेणार असून १५ ऑगस्ट अगोदर नवीन कुलगुरूंचे नाव घोषित होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवृत्त झाले होते. त्याअगोदरच मार्च महिन्यात निवड समितीने कुलगुरू पदासाठी इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविले होते. समितीकडे १२५ अर्ज पोहोचले व त्यांची ‘ऑनलाईन’ बैठकातून छाननी झाली.छाननी प्रक्रिया आटोपल्यानंतर पात्र उमेदवारांना सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले. ३१ व ३१ जुलै रोजी मुलाखती झाल्यानंतर त्यातील पाच नावे अंतिम करण्यात आली असून ती राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात आली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्वांच्या ७ ऑगस्ट रोजी मुंबई येथे राज्यपाल मुलाखती घेणार आहेत. या पाच उमेदवारांमध्ये दोन उमेदवार नागपूरचे असून त्यांना विद्यापीठातील महत्त्वाचे पद सांभाळण्याचा अनुभव आहे. याशिवाय नांदेड, पुणे व मुंबई येथील उमेदवारांचादेखील समावेश आहे.
नागपूर विद्यापीठ : आठवड्याअखेरीस कुलगुरुपदासाठी मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 12:11 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कुलगुरुपदासाठी पात्र उमेदवारांमधून अंतिम पाच जणांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल ७ऑगस्ट रोजी मुलाखती घेणार असून १५ ऑगस्ट अगोदर नवीन कुलगुरूंचे नाव घोषित होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठळक मुद्दे१५ ऑगस्टपूर्वी नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता