लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अनिश्चितता आहे. या स्थितीत परीक्षा अर्ज भरण्यासाठी विलंब शुल्क भरण्याची अट विद्यापीठाने घातली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून हे शुल्क भरणे अनेक विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून तात्काळ हे विलंब शुल्क मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.विद्यापीठातर्फे २२ मे रोजी एक परिपत्रक जारी केले. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत उन्हाळी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले नाहीत, त्यांनी विलंब शुल्कासह महाविद्यालयाकडे आपले अर्ज जमा करावे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. विलंब शुल्कासह त्यांना किती रक्कम जमा करावी लागेल हे विद्यापीठाने स्पष्ट न केल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. प्रत्यक्षात विद्यापीठाकडे विलंब शुल्क जमा करण्यासाठी अनेक नियम आहेत. त्यातील एका नियमानुसार विलंब शुल्काच्या रूपाने फक्त ५० ते १०० रुपये आकारणी केली जाते. तर अन्य नियमानुसार विद्यार्थ्यांकडून ५ हजार ते २० हजार रुपये विलंब शुल्क घेण्याचेदेखील प्रावधान आहे. विद्यापीठाकडे १६ मार्चपूर्वी परीक्षेचे अर्ज भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांवर ही पाळी आली आहे.यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेदेखील यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूर जिल्ह्यातच असणाºया कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने ५० ते १०० टक्के शिक्षण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विद्यापीठाने मात्र गरीब विद्यार्थ्यांना संकटात टाकले आहे. या स्थितीत त्यांच्याकडून विलंब शुल्क वसूल करणे अयोग्य आहे. विद्यापीठाने तात्काळ ही अट रद्द करावी. यासंदर्भात आम्ही कुलगुरूंना मागणी करणार आहोत. तर त्यांनी दिलासा दिला नाही तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे हा मुद्दा लावून धरू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी केले.विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत कराकोरोनाची स्थिती लक्षात घेता अंतिम वर्ष सोडून इतर परीक्षा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यापीठाने लगेच परत करावे अशी मागणी छात्र युवा संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा करावी, असे निवेदन समितीतर्फे सादर करण्यात आले आहे.
नागपूर विद्यापीठ : विलंब शुल्काची अट तात्काळ मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 6:59 PM
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अनिश्चितता आहे. या स्थितीत परीक्षा अर्ज भरण्यासाठी विलंब शुल्क भरण्याची अट विद्यापीठाने घातली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून हे शुल्क भरणे अनेक विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून तात्काळ हे विलंब शुल्क मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
ठळक मुद्देविद्यार्थी संघटनांची मागणी