लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐन प्रवेशप्रक्रियेच्या अगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती. अनेक महाविद्यालयांमधील प्रवेश जवळपास होत आले असताना विद्यापीठ प्रशासनाला उशिरा शहाणपण सुचले आहे. संबंधित यादीत सात महाविद्यालयांची नावे अनावधानाने प्रकाशित केल्याचा साक्षात्कार विद्यापीठाला आता झाला असून प्रवेशबंदीच्या यादीतून त्यांची नावे वगळण्यात आली आहे. मात्र प्रवेशप्रक्रिया आटोपत आली असताना विद्यापीठाला उशिरा आलेली ही जाग नेमकी कशामुळे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील १२६ महाविद्यालयांमध्ये आवश्यक नियमित शिक्षक, कर्मचारी व सोईसुविधा नसल्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले. याशिवाय अगोदर विद्यापीठाने निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज न करणाऱ्या ९८ तर ‘एलईसी’ची प्रक्रिया न पाळणाºया २९ महाविद्यालयांमधील प्रवेश गोठविले होते. एकूण २५३ महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली होती. ३१ मे व २ जून रोजी ही प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली. मात्र नागपूर विद्यापीठाने ४ जुलै रोजी नवीन परिपत्रक जारी केले. यात सात महाविद्यालयांची नावे देण्यात आली असून या महाविद्यालयात नियमित शिक्षक असतानादेखील अनावधानाने त्यांची नावे यादीत समाविष्ट झाली होती, असे कारण विद्यापीठाने दिले आहे. या महाविद्यालयांना विद्यापीठाचे संलग्नीकरण असून येथे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.इतका उशीर का ?२ जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये या महाविद्यालयांची नावे होती. त्यानंतर जवळपास महिनाभराने विद्यापीठाने आपली चूक सुधारण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. यासाठी एक महिन्याहून अधिक कालावधी का घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कालावधीत महाविद्यालयांनीदेखील एकदाही आवाज उचलला का नाही, हेदेखील एक कोडेच आहे. दरम्यान, चूक करणाºया संबंधितांवर काही कारवाई होणार की नाही, हे विद्यापीठाने स्पष्ट केलेले नाही.ही आहेत महाविद्यालये-एसएफएस महाविद्यालय (बीकॉम-कॉम्प्युटर अप्लिकेशन)-श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालय (एमए-हिंदी)-मातृसेवा संघ समाजकार्य महिला महाविद्यालय (एमफिल-सोशल वर्क)-वायसीसीई (एमटेक-इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग)-लोक महाविद्यालय, वर्धा (बीकॉम)-न्यू आर्टस्, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज, वर्धा (एमए- इंग्रजी व समाजशास्त्र)-बॅरि.शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, मोहपा (एमए-मराठी)
नागपूर विद्यापीठाचे वरातीमागून घोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 1:13 AM
ऐन प्रवेशप्रक्रियेच्या अगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती. अनेक महाविद्यालयांमधील प्रवेश जवळपास होत आले असताना विद्यापीठ प्रशासनाला उशिरा शहाणपण सुचले आहे. संबंधित यादीत सात महाविद्यालयांची नावे अनावधानाने प्रकाशित केल्याचा साक्षात्कार विद्यापीठाला आता झाला असून प्रवेशबंदीच्या यादीतून त्यांची नावे वगळण्यात आली आहे. मात्र प्रवेशप्रक्रिया आटोपत आली असताना विद्यापीठाला उशिरा आलेली ही जाग नेमकी कशामुळे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठळक मुद्देविद्यापीठाची चूक, फटका महाविद्यालयांना : प्रवेशप्रक्रिया आटोपत असताना मागे घेतली प्रवेशबंदी