शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नागपूर विद्यापीठाची ‘आॅनलाईन’ प्रमाणपत्र योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:53 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्याची योजना कागदावरच आहे. यासंबंधात तीन वर्षांअगोदर पुढाकार घेण्यात आला होता. मात्र वास्तवात या योजनेचा काहीच पत्ता नाही. विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी परीक्षा भवन तसेच वित्त विभागाच्या खिडक्यांवर तासन्तास उभे रहावे लागत आहे. सोबतच परीक्षा भवनात तैनात सुरक्षारक्षकांच्या दुर्व्यवहाराचादेखील त्यांना सामना करावा लागत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे परीक्षा भवनात विद्यार्थ्यांची समस्या ऐकण्यासाठी व सोडविण्यासाठी एकही अधिकारी नाही.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना होतोय मनस्ताप : सुरक्षारक्षकांकडून होतो दुर्व्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्याची योजना कागदावरच आहे. यासंबंधात तीन वर्षांअगोदर पुढाकार घेण्यात आला होता. मात्र वास्तवात या योजनेचा काहीच पत्ता नाही. विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी परीक्षा भवन तसेच वित्त विभागाच्या खिडक्यांवर तासन्तास उभे रहावे लागत आहे. सोबतच परीक्षा भवनात तैनात सुरक्षारक्षकांच्या दुर्व्यवहाराचादेखील त्यांना सामना करावा लागत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे परीक्षा भवनात विद्यार्थ्यांची समस्या ऐकण्यासाठी व सोडविण्यासाठी एकही अधिकारी नाही.विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होताच विविध प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी येत असतात. विद्यार्थ्यांची पायपीट वाचावी यासाठी आॅनलाईन व्यवस्था सुरू करण्यात येईल, असा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला होता.मात्र प्रत्यक्षात ही व्यवस्था अद्यापही लागू होऊ शकलेली नाही. अगोदर अर्ज घेणे व त्यानंतर शुल्क जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेत उभे रहावे लागत आहे.सोबतच त्यांना विद्यापीठाच्या परीक्षा भवनात तैनात सुरक्षा रक्षकांच्या दुर्व्यवहाराचादेखील सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना व त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांना ओळखपत्र मागितले जाते. जर ते नसेल तर त्यांना परीक्षा भवनात प्रवेशदेखील करता येत नाही. अनेकदा तर ओळखपत्र असूनदेखील विद्यार्थ्यांना आत जाऊ दिले जात नाही.‘काऊंटर’वर माहितीच मिळत नाहीविद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने सुविधा केंद्र सुरू केले आहे. यासाठी खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. मात्र या कर्मचाºयांकडे अपुरी माहिती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी मनस्ताप होतो.बसण्याचीदेखील व्यवस्था नाहीपरीक्षा भवनात विद्यार्थ्यांसाठी बसण्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्यांना अक्षरश: जमिनीवर बसून अर्ज भरावे लागतात. विद्यार्थ्यांनी याची तक्रार अधिकाºयांकडे केली. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या माध्यमातून वर्षाला ५४ कोटी रुपये प्राप्त होतात. मात्र तरीदेखील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही.शिक्षकांनादेखील करण्यात येते अपमानितविद्यापीठाच्या परीक्षा विभागात दररोज महाविद्यालय व विद्यापीठांचे शिक्षक परीक्षांच्या कामासाठी येतात. मात्र त्यांनादेखील सुरक्षारक्षकांच्या दुर्व्यवहाराचा सामना करावा लागतो. याबाबतीत काही शिक्षकांनी तक्रारदेखील केली. मात्र त्याची दखल अधिकाºयांनी घेतली नाही.छायाचित्रकाराचा कॅमेरा हिसकलाविद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’चे पथक परीक्षा भवनात पोहोचले. विद्यार्थ्यांना होणाºया समस्या व सुरक्षारक्षकांची वागणूक यांची छायाचित्रे काढण्यासाठी छायाचित्रकाराने कॅमेरा काढला असता गोपनीय शाखेचे सहायक कुलसचिव मोतीराम तडस यांनी छायाचित्र काढण्यास मनाई केली. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.नीरज खटी यांचे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच तडस यांनी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या सुरक्षारक्षकांना छायाचित्रकाराकडून कॅमेरा हिसकविण्याचे निर्देश दिले. याबाबतीत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना कळविले असता त्यांनी डॉ.खटी यांच्याशी बोलण्यास सांगितले. अखेर डॉ.खटी यांनी जवानांना कॅमेरा परत करण्याची सूचना केली.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठonlineऑनलाइन