नागपूर :नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटरतर्फे (ओसीडब्ल्यू) जलकुंभ स्वच्छतेची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत लक्ष्मीनगर झोनमधील त्रिमूर्तीनगर जलकुंभाची स्वच्छता ३० नोव्हेंबरला व प्रतापनगर जलकुंभाची स्वच्छता २ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी जलकुंभातून पाणीपुरवठा होणाऱ्या वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तर टँकरद्वारे ज्या वस्त्यांना पाणीपुरवठा होतो त्यांनाही पाणी मिळणार नाही. महापालिका व ओसीडब्ल्यू वर्षातून एकदा जलकुंभ स्वच्छतेची मोहीम राबविते. २०१२ पासून ही मोहीम सातत्याने सुरू आहे. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणारे दोन्ही जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येणार आहेत.
- जलकुंभाच्या स्वच्छतेमुळे बाधित होणाऱ्या वस्त्या
त्रिमूर्तीनगर जलकुंभ (३० नोव्हेंबर) : सोनेगाव, पन्नास लेआऊट, इंद्रप्रस्थनगर, मनीष लेआऊट, सहकारनगर, गजाननधाम, ममता सोसायटी, समर्थनगरी, एच. बी. इस्टेट, मेघदूत विला, वाहने लेआऊट, सीजीएचएस कॉलनी, स्वागत सोसायटी, प्रसाद सोसायटी, पॅराडाइज सोसायटी, शिवशक्ती लेआऊट, पाटील लेआऊट, अमरआशा सोसायटी, भामटी, जय बद्रीनाथ सोसायटी, भोगे लेआऊट, आदिवासी सोसायटी, लोकसेवानगर, साईनाथनगर, गुडधे लेआऊट, इंगळे लेआऊट, प्रियदर्शनीनगर, भुजबळ लेआऊट, त्रिमूर्तीनगर, सोनेगाव वस्ती, भेंडे लेआऊट, वेलकम सोसायटी, साईनाथनगर, नासुप्र लेआऊट.
प्रतापनगर जलकुंभ (२ डिसेंबर) : खामला जुनी वस्ती, सिंधी कॉलनी, व्यंकटेशनगर , गणेश कॉलनी, मिलिंदनगर, प्रतापनगर, टेलिकॉमनगर, स्वावलंबीनगर, दीनदयालनगर, लोकसेवानगर , वागणे लेआऊट, पायोनियर सोसायटी, खामला, त्रिशरणनगर, जीवनछाया नगर, संचयनी वसाहत, पूनम विहार, स्वरूपनगर, हावरे लेआऊट, अशोक कॉलनी, शास्त्री लेआऊट, मालवीयनगर, गौतमनगर, शिवनगर, सर्वोदयनगर, कोतवालनगर, विद्याविहार कॉलनी.
ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने, मनपा-OCW ने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.