लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात याही वेळे भाजपचे सुधाकर देशमुख व काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होणार आहे. मागील निवडणुकीतही या दोघांमध्ये थेट लढत झाली होती. गेल्या २० वर्षांपासून भाजपचे कमळ फुलत आले आहे.२०१४ मध्ये भाजपचे सुधाकर देशमुख २६,४०२ मतांनी विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हे मताधिक्य कायम राहिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना येथे २७,२५२ मतांची आघाडी मिळाली. भाजपचे पक्ष संघटन येथे बळकट आहे; शिवाय देशमुख बऱ्याच पूवीपासून कामाला लागले आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच झाली. महापौर नंदा जिचकार, नगरसेवक भूषण शिंगणे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी नगरसेवक रमेश चोपडे यांचीही नावे रेसमध्ये होती. यावेळी उमेदवार बदलेल, असा दावा पक्षांतर्गत केला जात असताना प्रत्यक्षात सुधाकर देशमुख यांनाच तिकीट मिळाले.प्रारंभीच्या फेऱ्यात आघाडीवर असलेले देशमुख माघारले आहेत. आठव्या फेरी अखेर ठाकरे यांना ४२४८७ मते तर देशमुख यांना ३५८०७ मते मिळाली आहेत. आघाडी ६६८० एवढी आहे.
रिंगणात एकूण १२ उमेदवार
निवडणूक रिंगणात एकूण १२ उमेदवार असून त्यात बसपाचे अफजल फारूक,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे डॉ. विनोद रंगारी आणि अपक्ष मनोजसिंग आणि राजीव रंजनसिंग हे प्रमुख उमेदवार आहेत. असे होते २०१४ चे चित्रसुधाकर देशमुख (भाजप-विजयी)विकास ठाकरे (काँग्रेस-पराभूत)