एअर इंडियाचे अश्वनी लोहानी यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत : एमआरओमध्ये लहान विमानांची दुरुस्ती होणारनागपूर : मिहानमधील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये सर्व कंपन्यांच्या विमानांची दुरुस्ती व देखरेखीसाठी (एमआरओ) विश्वस्तरीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. बोर्इंगसह आता एअरबस कंपनीच्या विमानांच्या दुरुस्तीसाठीही नागरी वाहतूक संचालनालयातर्फे (डीजीसीए) काही दिवसांपूर्वी परवाना मिळाला आहे. देशाच्या मध्यवर्ती भागातील विश्वस्तरीय एमआरओमुळे नागपूर ‘रिजनल कनेक्टिव्हिटी’चे हब होऊ शकते, त्या दिशेने एमआरओत आधुनिक उपकरणे आणि सुविधांचा विकास करण्यात येत आहे, अशी माहिती एअर इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी दिली. देशात विमान उड्डयण क्षेत्रात २३ टक्के वाढलोहानी यांनी सांगितले की, देशातील छोटे संचालित आणि अनुपयोगी विमानतळांचा उपयोग विभागीय विमानसेवांसाठी होऊ शकतो. देशात विमानाच्या फेऱ्या आणि प्रवाशांची संख्या वाढली आहे. विमान उड्डयण क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. गेल्या वर्षांत जगात या क्षेत्रात ८ टक्के वाढ असताना भारतात ती २३ टक्के झाली आहे. पुढील वर्षी एअर इंडियाच्या ताफ्यात १४ नवीन विमानेसध्या एअर इंडियाच्या ताफ्यात १०७ विमाने आहेत. त्यापैकी चार जुनी विमाने काढली असून, पुन्हा पाच विमानांच्या सेवांना विराम देण्यात येणार आहे. त्याऐवजी दर महिन्यात एटीआर-७२ आणि एअरबस कंपनीचे प्रत्येकी एक विमान कंपनीच्या ताफ्यात नव्याने येणार आहे. अर्थात पुढील वर्षी सात ते आठ महिन्यात १४ नवीन विमाने दाखल होतील. क्षेत्रीय विमानसेवेसाठी ३-टायर शहरांचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘रिजनल कनेक्टिव्हिटी’चे हब होणार नागपूर
By admin | Published: November 04, 2016 2:29 AM