मुख्यमंत्र्यांची माहिती : विकासाला अधिक प्राधान्यनागपूर : नागपुरात दुसरे विमानतळ विकसित करण्यासाठी प्रस्ताव विचाराधीन आहे. भविष्यातील आवश्यकता पाहून गरजेप्रमाणे यासंदर्भात प्रयत्न केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मिहान आणि कार्गो हब येथे येणाऱ्या उद्योगांना लक्षात घेत दुसऱ्या विमानतळाचा विकास करण्याचा शासनाचा विचार आहे. सध्या मिहानमधून कमी प्रमाणात निर्यात करण्यात येत आहे. त्यामुळे वर्तमानात विमानतळावरील दुसऱ्या धावपट्टीचे काम पुढील चार ते पाच वर्षात पूर्ण केले जाईल. सध्याच ही धावपट्टी विकसित करण्याची फारशी गरज नाही. कार्गोचे काम वाढल्यावर दुसऱ्या धावपट्टीची गरज भासेल त्यावेळी ती धावपट्टी तयार करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय उड्डाण नागपुरातून मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी कतार एअरवेजशी बोलणी सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)सिंचन घोटाळ््यात खुलासा राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ््यात एफए कन्स्ट्रक्शन कंपनीने एकाच दिवसांत ८०० कोटी रुपये नगदी काढले होते, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. सिंचन घोटाळ््याबाबत सरकार गंभीर असल्याचे ते म्हणाले. २००९ मध्ये एका सिंचन योजनेसाठी आघाडी सरकारने जालना येथील एका प्रकल्पासाठी १०० कोटींचे कंत्राट दिले होते. मात्र दस्तऐवजात संशोधन करीत हे काम ७५० कोटींचे करण्यात आले. सिंचन घोटाळ््याच्या चौकशीबाबत सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, माजी मंत्री सुनील तटकरे यांनी ३०० कंपन्यांचे नटवर्क तयार करीत कामाचे वितरण केले आहे. त्यामुळे तपासाला वेळ लागतो आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना क्लीन चीट देण्याच्या प्रकरणावर ते म्हणाले, या प्रकरणात जे दस्तऐवज जप्त करण्यात आले होते, यावर विविध अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र दोन तीन अधिकाऱ्यांनी आॅगस्टमध्ये सोपविलेल्या प्रश्नावलीवर उत्तर दिले नाही.सहा पदरी एक्स्प्रेस हाय वे तयार करणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेला नागपूर-मुंबई सिक्स लेन कम्युनिकेशन एक्स्प्रेस हाय वे चे काम पुढील वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरपासून प्रारंभ करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सरकारी निवासस्थान रामगिरी येथे निवडक संपादकांशी चर्चा करताना दिली. या सहापदरी एक्स्प्रेस वे चा डीपीआर तयार आहे. यासंदर्भातील अलाईनमेंटचे सर्वेक्षण सुरू आहे. राज्य शासनाने या एक्स्प्रेस वे ला ‘स्ट्रेट अलाईनमेंट’ मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पासाठी ३० हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येणार आहे. मलेशियन शासनाने यासंदर्भात उत्सुकता दर्शविली आहे. राज्य शासनाने मलेशियन सरकारला हे काम करण्याची संधी दिली तर येथे गुंतवणूक करण्यास ते तयार आहेत. याशिवाय निधीसाठी आशियन डेव्हलपमेंट बँकेशीही संवाद सुरू आहे. या निधीची वसुली टोल वा कुठल्या अन्य मार्गाने करावयाची, हे अद्याप निश्चित करण्यात आले नाही. डीपीआर आणि अलाईनमेंट नंतरच यासंदर्भात विचार केला जाईल. रेल्वे ट्रॅकही होणार नागपूर ते मुंबई दरम्यान मागील सरकारने बुलेट ट्रेन चालविण्यासाठी सर्वेक्षण केले होते. पण यासंदर्भात सध्याच राज्य शासनाने कुठलाही विचार केलेला नाही. एक्स्प्रेस वे ला समांतर किंवा रस्त्याच्या मधून रेल्वे ट्रॅक टाकण्याचा शासनाचा विचार आहे.
नागपुरात होणार दुसरे विमानतळ
By admin | Published: December 24, 2015 3:34 AM