शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

नागपूर निर्यातक हब बनणार:रमेश बोरीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:24 AM

भारत सरकारतर्फे निर्यातदारांसाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा फायदा निर्यातदारांना होत आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर हे भविष्यात निर्यातक हब बनणार असल्याचे प्रतिपादन डीजीएफटी नागपूरचे सहायक संचालक रमेश बोरीकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देएनव्हीसीसीतर्फे निर्यातीवर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत सरकारतर्फे निर्यातदारांसाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा फायदा निर्यातदारांना होत आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर हे भविष्यात निर्यातक हब बनणार असल्याचे प्रतिपादन डीजीएफटी नागपूरचे सहायक संचालक रमेश बोरीकर यांनी येथे केले.नाग विदर्भ चेंबरऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी), भारत सरकारचा उपक्रम ईसीजीसी लिमिटेड आणि डीजीएफटीच्या संयुक्त विद्यमाने निर्यातदारांसाठी ‘निर्यात व्यवहारात जोखीम व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन चेंबरच्या सिव्हिल लाईन्स येथील सभागृहात करण्यात आले. यावेळी ईसीजीसी नागपूरचे शाखा व्यवस्थापक राजेश देशुरकर, सहायक व्यवस्थापक नितीन वैद्य आणि चेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी प्रामुख्याने उपस्थित होते.बोरीकर यांनी आयईसी नोंदणी, एमआयईएस अ‍ॅडव्हांस लायसन्स आदींसह भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली आणि बाजारपेठेतील अनुभव सांगितले. व्यापाऱ्यांची व्यवसाय वाढीची नेहमीच इच्छा असते. पण त्यासाठी त्यांना काही जोखीमही घ्यावा लागतात. निर्यातदार व्यवसायाचा विस्तार नव्या क्षेत्रात करतो तेव्हा त्याला राजकीय, विदेशी चलन, वित्तीय जोखीम आदींचा सामना करावा लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता असते तेव्हा निर्यातदारांना जास्त जोखीम उचलावी लागते. त्यांनी निर्यातदारांच्या शंकांचे समाधान केले.प्रास्तविकेत हेमंत गांधी म्हणाले, विदर्भ क्षेत्रात व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढीसाठी चेंबर मदत करण्यास कटिबद्ध आहे. चेंबरने नेहमीच विदर्भ आणि लगतच्या राज्यांमध्ये निर्यातदारांना आयात-निर्यात संदर्भात येणाºया अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.याप्रसंगी चेंबरचे सचिव संजय के. अग्रवाल, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, फारुक अकबानी, सहसचिव रामअवतार तोतला, स्वप्निल अहिरकर, शब्बार शाकीर आणि निर्यातक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूर