लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरसह इतर विविध विभागांच्या सात शस्त्रक्रियागृहाला नऊ कोटी रुपयांमधून ‘मॉड्युलर ओटी’ म्हणजे अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे स्वरूप दिले जाणार आहे. याची सुरुवात ‘ट्रॉमा’च्या शस्त्रक्रियागृहापासून होणार आहे. विशेष म्हणजे, या पूर्वी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दोन व मेडिकलमधील दोन शस्त्रक्रिया गृहांना ‘मॉड्युलर ओटी’चे स्वरुप देण्यात आले आहे.पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजना आणि जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नवनवीन विभागाचे बांधकाम आणि अद्ययावत यंत्रसामुग्रीमुळे मेडिकलचा चेहरामोहरा बदलत आहे. पुढील महिन्यापर्यंत ट्रॉमा केअर सेंटर ९० खाटांसह पूर्ण क्षमतेने रुग्णसेवेत असणार आहे. तर लवकरच ३०-३० खाटांचे तीन अतिदक्षता विभागालाही सुरुवात होणार आहे. मेडिकलचे शस्त्रक्रिया गृहही अद्ययावत व्हावे यासाठी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे हे पदभार स्वीकारल्यापासून प्रयत्नात होते. अखेर पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या १५० कोटींमधून १४ कोटींच्या निधीला २०१६ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली. या निधीतून सात शस्त्रक्रिया गृह अद्ययावत होणार होते. परंतु ज्या कंपनीला याचे काम मिळाले त्यांनी काम पूर्ण करायला दोन वर्षांचा कालावधी लावला. परिणामी, शल्यचिकित्सा विभाग, अस्थिरोग विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील युरोलॉजी विभाग व हृदयशल्यचिकित्सा विभागाची प्रत्येकी एक-एक असे चारच शस्त्रक्रिया गृहांना ‘मॉड्युलर’चे स्वरुप देऊ शकले. उर्वरीत तीन व यात पाच आणखी शस्त्रक्रिया गृहांना अद्ययावत करण्याच्या कार्याला आता लवकरच सुरुवात होणार आहे. याला साधारण ९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यात शल्यचिकित्सा विभाग, स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभाग, कान, नाक, घसा विभाग (ईएनटी), नेत्ररोग विभाग व प्लास्टिक सर्जरी विभागाची प्रत्येकी एक-एक व ट्रॉमा केअर सेंटरमधील दोन शस्त्रक्रिया गृह अद्ययावत होणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी सांगितले.असे असणार ‘मॉड्युलर ओटी’मेडिकलच्या बांधकामाला ६९ वर्षे झाली. या काळात शस्त्रक्रिया गृहांमध्ये बदल झाले असलेतरी ते अद्ययावत नव्हते. शस्त्रक्रियेच्यावेळी सर्वात जास्त धोका असतो तो संसर्गाचा. तो कमी करण्यासाठी ‘मॉड्युलर ओटी’चा प्रस्ताव समोर आला. यात शस्त्रक्रिया गृहांच्या आतून स्टीलचे पत्रे लावले जातात. यामुळे ही ‘ओटी’ बॅक्ट्रीया फ्री होते. या शिवाय, विशेष तंत्रज्ञानाचा येथे उपयोग केला जात असल्याने शस्त्रक्रियेमध्ये अचूकता येते.
नागपुरात ९ कोटीतून साकारणार सात ‘मॉड्युरल ओटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 9:23 PM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरसह इतर विविध विभागांच्या सात शस्त्रक्रियागृहाला नऊ कोटी रुपयांमधून ‘मॉड्युलर ओटी’ म्हणजे अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे स्वरूप दिले जाणार आहे. याची सुरुवात ‘ट्रॉमा’च्या शस्त्रक्रियागृहापासून होणार आहे. विशेष म्हणजे, या पूर्वी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दोन व मेडिकलमधील दोन शस्त्रक्रिया गृहांना ‘मॉड्युलर ओटी’चे स्वरुप देण्यात आले आहे.
ठळक मुद्देमेडिकल : शस्त्रक्रियागृह होणार ‘बॅक्ट्रीया फ्री’