लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: : मुख्यमंत्र् यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत करावी असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानभवन परिसरात व्यक्त केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना त्यांनी राज्यातील अनेक भागांचा दौरा करून शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये द्यावे, अशी मागणी केली होती. पण ते आता खुद्द मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यांनी केलेली मागणी प्रत्यक्षात आणून शेतकऱ्यांना मदत करावी असे ते पुढे म्हणाले.देशात संवेदशनशील विषय गाजत आहेत. राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. त्याचा निषेध करण्याची मागणी आम्ही सभागृहात सभापतींकडे केली होती. पण आमची मागणी त्यांनी फेटाळून लावली. त्याचा निषेध म्हणून आम्ही सभागृहाचा त्याग केला आहे. यावेळी परिणय फुके उपस्थित होते.
नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 3:11 PM