लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशात काढण्यात येत असलेल्या मोर्चांना अनेक ठिकाणी गालबोट लागले आहे. महाराष्ट्रात अनेक जागी धर्म पंथाचे लोक राहतात. राज्यात काढण्यात येणारे मोर्चे शांततेत काढाले जावेत असे आवाहन राज्याचे गृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन परिसरात केले.लोकशाही मार्गाने मोर्चे काढल्यास उद्दिष्टही साध्य होते. नेत्यांनी लोकांना शांततेच्या मार्गाने निषेध करण्याचे आवाहन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी नेत्यांनी घ्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेत्यांनी आणि लोकांनी पोलिसांन सहकार्य करावे असे ते पुढे म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, राज्यात महिला निर्भयपणे वावराव्यात याकरिता आंध्रप्रदेशात तयार करण्यात आलेल्या दिशा कायद्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलणे झालेले आहे. आरोपींना मृत्युदंडापर्यंत शिक्षा झालीच पाहिजे. आंध्रचा कायदा आम्ही तपासून पाहू, शिवाय राज्यातील यासंदर्भातील कायदे तपासून पाहण्याबाबत चर्चा करू असे ते पुढे म्हणाले.अजित पवार यांना क्लीन चिट देण्याच्या संदर्भात ते म्हणाले, ही न्यायालयीन बाब आहे व त्यावर बोलणे योग्य नाही.नारायण राणे यांचा जळफळाटमहाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही असे वक्तव्य नारायण राणे यांनी आज एका पत्रपरिषदेत केले होते. ते मुख्यमंत्री शिवसेनेमुळेच झाले होते, हे त्यांनी विसरू नये. महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेची भूमिका कायम आहे. किमान समान कार्यक्रमानुसार शेतकऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम सरकारचे आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यातून त्यांचा जळफळाट दिसून येतो अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील मोर्चे शांततेत काढावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 4:05 PM