लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी तिन्ही पक्षात अजुनही सर्व काही सुरळीत सुरु आहे, असे म्हणता येत नाही. राष्ट्रवाद काँग्रेसचे अजित पवार हे अधूनमधून आपल्याच सरकारवर बरसत असतात. शनिवारी सुद्धा असेच काहीसे चित्र दिसून आले. विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्याचा मुद्यावर विरोधीपक्षाने आक्षेप घेतला असता अजित पवारही सरकारवर बरसले.शनिवारी हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. सकाळी १० वाजता सभागृहाचे कामकाज सुरु झाले. परंतु यावेळी एकह मंत्री उपस्थित नव्हते. विरोधी पक्षातील सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दरम्यान औचित्याचे मुद्दे पुकारले. यावरही विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. भाजपचे चंद्रकांत दादा पाटील यांनी मंत्री उपस्थित नसताना कामकाज चालवणे योग्य नाही. काही वेळ कामकाज स्थगित करा, अशी मागणी केली. दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवारही भडकले. ते म्हणाले ‘‘ गेल्या २५ वर्षापासून मी या सभागृहात आहे. परंतु असे चित्र कधी पाहिले नाही. कॅबिनेट मंत्री उपस्थित नसताना सभाागृहााचे कामकाज चालूच शकत नाही. मंत्री कमी आहे. मग मंत्रिमंडळचा विस्तार करायला कुणी थांबवले होते’’ असा सवालही त्यांनी केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी १० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले. एकूणच अजित पवार यांच्या या संतापानंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; अजित पवार सरकारवर भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:24 AM
राष्ट्रवाद काँग्रेसचे अजित पवार हे अधूनमधून आपल्याच सरकारवर बरसत असतात. शनिवारी सुद्धा असेच काहीसे चित्र दिसून आले.
ठळक मुद्देम्हणाले मंत्री मंडळाचा विस्तार करायला कुणी रोखले होतेमंत्री उपस्थित नसल्याने सभागृहातील कामकाज स्थगित करावे लागले