लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: पंजाब महाराष्ट्र बँकेला रिझर्व्ह बँकेने आपल्या कक्षेत घ्यावे व त्यातील ठेवीदारांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी हिवाळी अधिवेशनात विधान भवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सभागृहात मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.ही को आॅपरेटिव्ह बँक आहे. यात अनेक सोसायट्यांचा पैसा आहे, व्यापाऱ्यांचा पैसा आहे. जे सेवानिवृत्त झालेत त्यांच्या ठेवी आहेत. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. यात १९ जण मृत्युमुखी पडले आहेत. यात आणखीही वाढ होऊ शकते. या बँकेचे पुनरुज्जीवन केले जावे. याबाबत सरकारने रिझर्व्ह बँकेसोबत बोलावे, वित्त मंत्र् यांशी आणि पंतप्रधानांशीही चर्चा करावी व ही बँक अन्य कुठल्या बँकेत विलीन करावी अशी आमची सरकारला विनंती आहे
नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; पंजाब महाराष्ट्र बँकेला तारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:29 AM