शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

'दिल्लीत जातो अन् निधी आणतो, तुमच्यासारखं...', CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 7:54 PM

'केंद्र सरकारने आम्हाला निधी दिला, त्यासाठी प्रयत्न करावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो.'

नागपूर: विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या, म्हणजेच 7 डिसेंबरपासून नागपूर इथे सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'ते म्हणतात गेल्या अडीच वर्षात केंद्र सरकारने त्यांना पैसे दिले नाही. तुम्ही मागायला हवे होते. तुमच्या अहंकारामुळे राज्यचे नुकसान केले. अनेक प्रकल्प बंद पाडले, अनेक प्रकल्प स्थगित केले. आमचे सरकार आल्यानंतर ती स्थगिती उठवण्यात आली. ते आम्हाला म्हणाले आम्ही स्वाभिमान हरवला आहे, दिल्लीत जातात, बाहुली आहेत. हो आम्ही दिल्लीला जातो. दिल्लीला जातो अन् निधी आणतो.' 

'केंद्र सरकारने आम्हाला निधी दिला. मागितल्या काही शिवाय मिळत नाही. प्रयत्न करावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. तुमच्यासारखं कडकसिंग बनून चालत नाही. ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही, त्यांनी आमच्यावर आरोप करायचे? स्वाभिमानाची भाषा करायची? तुम्ही विकासाच्या बाता करता, पण लोकं सुज्ञ आहेत. आमच्या दोऱ्या मतदारांच्या हातात आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

'कोर्टात टीकणारे आरक्षण देणारयावेळी सीएम शिंदेंनी मराठा आरक्षणावरही भाष्य केले. 'आम्ही आरक्षणाबाबत सुरुवातीपासून सकारात्मक आहोत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आणि इतर कुठल्याही समजावर अन्याय होणार नाही, कुणाचेही आरक्षण कमी होणार नाही, ही भूमिका आमची आहे. सरकारची भूमिका मराठा समाजारा आरक्षण देण्याची आहे. कोर्टात टीकणारे मराठा आरक्षण देण्याचे काम सरकार करेल. सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही एकनाथ शिंदेंनी केले.

'विरोधकांसाठी आता सुपारी-पान ठेवू' सरकारने आयोजित केलेल्या चहा पानावर विरोधकांनी बहिष्टार टाकला. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावला. विरोधकांना विदर्भ मराठवाड्यासाशी काहीही देणे घेणे नाही, हे त्यांच्या भूमिकेवरून दिसते. विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत काही नेते झोपले होते, जसे ते तीन राज्यात झोपले.  आमच्या चहापानावर बहिष्कार घातला, विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पण ठेवावे लागेल, म्हणजे कदाचित ते येतील,' असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन