- सुमेध वाघमारेनागपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. हजारो वर्षे दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची अस्मिता जागृत केली. नागपूरच्यादीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेऊन बुद्ध तत्त्वज्ञानाला समाजमनात रुजविण्याचे क्रांतीदर्शी कार्य पूर्ण केले. ६८व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्याने त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो मैलावरु न लाखोंच्या संख्येने अनुयायी आले होते. जय बुद्ध व जयभीम या एकाच जयघोषाने दीक्षाभूमीचा परिसर दुमदुमला होता.
हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे हे देशाच्या कानाकोपºयातूनच नव्हे तर नेपाळ, थायलॅण्ड, जापान, श्रीलंका येथूनही दीक्षाभूमीवर आले होते. लाखो अनुयायांच्या गर्दीने दीक्षाभूमी फुलून गेली होती. युवकांच्या झुंडीच्या झुंडी ‘जयभीम’चा नारा देत गर्दीत शामील होत होती. गर्दी अफाट असली तरी सर्वच एकमेकांना सांभाळून घेत होते.
पवित्र अस्थिंच्या दर्शनासाठी लागल्या रांगादीक्षाभूमी येथील स्तुपामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिंचे जतन केलेला कलश दर्शनार्थ ठेवण्यात आला आहे. या पवित्र अस्थिंचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांची रांग लागली होती. दीक्षाभूमी परिसरातील बोधी वृक्षाला आकर्षक रोषणाईने सजविले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील दीक्षाभूमीचा परिसर तेजाने न्हावून निघाला होता. समता सैनिक दलाचे सैनिक आपली सेवा व सुरक्षा पुरविताना दिसून आले. लाखोंच्या संख्येने येणाºया अनुयायांसाठी हजारावर संघटना सरसावल्या होत्या. पाण्यापासून ते भोजनदानाची चोख व्यवस्था त्यांनी केली होती.
वस्त्या-वस्तांमधून निघाली रॅलीनागपूरच्या विविध वस्त्यांमध्ये ‘भीम रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. दुपारी निघालेली रॅली सायंकाळी दीक्षाभूमीवर पोहचताच एकच जल्लोष होत होता. पांढºया वस्त्रातील अनुयायी ‘जयभीम’च्या जयघोषात एकमेकांना शुभेच्छा देत होते. इंदोरा, टाकळी सीम, नारा, बेझनबाग, अंबाझरी, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, चंदननगर, जाटतरोडी, चंद्रमणीनगर, नवीन बाभूळखेडा, मानेवाडा, दिघोरी या सारख्या कितीतरी वस्त्यांमधून रॅली निघाल्या.