लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपेपर्यंत जिल्हा परिषदेत कोरोनाची विशेष धास्ती दिसून आली नाही. पण कोरोनाने आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्रवेश केल्यामुळे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हा परिषद ‘अलर्ट’ झाली आहे.सिव्हिल लाईन्स येथील जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात लॉकडाऊनच्या काळातही कुठूनही प्रवेश करता येत होता. परंतु आता प्रशासनाने मुख्यालयातील इतर सर्व प्रवेश मार्ग बंद केले. त्यामुळे आता अभ्यागत असो वा कर्मचारी व अधिकारी यांना एकाच मार्गाने कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर राज्य सरकारने शिथिलता दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची जिल्हा परिषदेत गर्दी वाढली आहे. कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित राहत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने सुरक्षात्मक पाऊल उचलले आहे. कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात धुणे, येणाऱ्यांचे तापमानसुद्धा मोजले जात आहे. कार्यालयात मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. शारीरिक अंतर पाळणे, कार्यालयाचे निर्जंतुकीकरण, अभ्यागतांपासून संसर्ग टाळणे आदींची दक्षता घेण्यात आली आहेत.विलगीकरण कक्षाचीही निर्मितीजिल्हा परिषदेमध्ये सध्या वाढलेली गर्दी लक्षात घेता, अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास लक्षणे दिसून आल्यास तात्पुरत्या विलगीकरण (क्वारंटाईन) कक्षाची व्यवस्था केली आहे. जि.प. प्रशासनाने जुन्या इमारतीमधील एका सभागृहात ही सोय केली आहे. येथे तीन बेड ठेवण्यात आले आहेत.
नागपूर जिल्हा परिषद ‘अलर्ट’ : मुख्यालयातील इतर प्रवेश मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 10:00 PM
लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपेपर्यंत जिल्हा परिषदेत कोरोनाची विशेष धास्ती दिसून आली नाही. पण कोरोनाने आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्रवेश केल्यामुळे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हा परिषद ‘अलर्ट’ झाली आहे.
ठळक मुद्देसंसर्ग टाळण्यासाठी केल्या उपाययोजना