शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

नागपुरातील महाठग बघेल मध्य प्रदेशात सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:17 AM

विविध ठिकाणी साई प्रकाश प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड या नावाने शाखा सुरू करून हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारा कुख्यात ठगबाज पुष्पेन्द्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल याच्या मध्य प्रदेशात जाऊन गुन्हे (आर्थिक) शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या.

ठळक मुद्देहजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडागुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध ठिकाणी साई प्रकाश प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड या नावाने शाखा सुरू करून हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारा कुख्यात ठगबाज पुष्पेन्द्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल याच्या मध्य प्रदेशात जाऊन गुन्हे (आर्थिक) शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या.बघेल याने जयपूर (राजस्थान) मध्ये सर्वप्रथम आपल्या कंपनीचे कार्यालय उघडले होते. २०१० मध्ये त्याने धंतोलीतील भिवापूरकर चेंबरमध्येही शाखा सुरू केली. आपल्या कंपनीत मासिक आणि वार्षिक मुदतीत हप्त्याने रक्कम जमा करायची. मुदतीनंतर दीडपट रक्कम आणि अपघाती विमा क्लेम देण्यात येतो, असे तो सांगत होता. फिक्स डिपॉझिट केल्यास साडेपाच वर्षांत दुप्पट आणि नऊ वर्षांत तिप्पट परतावा मिळेल, असा दावा केला जात होता. गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात एजंट नेमले होते. बँकेत रक्कम गुंतविल्यास दुप्पट रक्कम मिळायला आठ वर्षे लागतात, असे सांगून एजंट गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढायचे. स्वत: बघेल मोठ्या थाटामाटात सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना आकर्षित करायचा. अशा प्रकारे त्याने हजारो गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीत रक्कम जमा करायला बाध्य केले आणि कोट्यवधी रुपये जमा करून आरोपीने नागपुरातून गाशा गुंडाळला. २०१६ मध्ये त्याने कंपनीला टाळे लावले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा पहिला गुन्हा नंदा विष्णू गोणेकर यांच्या तक्रारीवरून जरीपटका ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर फसवणूक झालेल्यांची संख्या वाढल्याने तो गुन्हे शाखेत वर्ग करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बी. एस. नरके यांनी आरोपी बघेलचा कसून तपास केला. तो मध्य प्रदेशातील ग्राम सेमरपाखा, ब्योहारी (जि. शहडोल) मध्ये दडून असल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेच्या (आर्थिक) पथकाने त्याच्या तेथे जाऊन मुसक्या बांधल्या. ११ जानेवारीला त्याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करून त्याचा १७ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे.विदर्भात अनेकांची फसवणूकमहाठग बघेल याने नागपूरच नव्हे तर गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि अकोला या ठिकाणीसुद्धा शाखा उघडल्या होत्या. तेथेही त्याने शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची चर्चा आहे. पीडितांनी गुन्हे शाखेत संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटक