शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

मोकाट कुत्र्यांमुळे नागपूरकर धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:34 AM

उपराजधानीत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. सरकार शहरात असल्याने काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला आहे. एवढेच नव्हे तर विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तात्पुरता बंदोबस्त करण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. पण शहरात मोकाट कुत्र्यांचा मुक्तसंचार असून त्यांची दहशत कायम असून, नागरिकांचा जीव धोक्यात आहे.

ठळक मुद्देमहापौर-आयुक्तांनी रात्री रस्त्यावर फिरावे : दर मिनिटाच्या अंतरावर दिसतात कुत्री

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. सरकार शहरात असल्याने काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला आहे. एवढेच नव्हे तर विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तात्पुरता बंदोबस्त करण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. पण शहरात मोकाट कुत्र्यांचा मुक्तसंचार असून त्यांची दहशत कायम असून, नागरिकांचा जीव धोक्यात आहे.रात्रीला कामावरून घरी परतणाऱ्यांच्या कुत्र्यांच्या टोळ्यांकडून हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत. पावसामुळे यात अधिकच भर पडली आहे. दुचाकी वाहन दिसले की कुत्री धावतात. यामुळे अनेकदा अपघात होऊन वाहन चालक जखमी होतात. वेळप्रसंगी जीव जाण्याचा धोका असतो. घरातील कमावती व्यक्ती अपघातग्रस्त झाली तर कुटुंबाचे काय होणार, याचाही विचार महापालिका प्रशासन चालविणाºयांच्या डोक्यात येत नाही. महापौर व आयुक्तांनी रात्रीला शहरातील रस्त्यांवरून फेरफटका मारला तर दर मिनिटाच्या प्रवासानंतर मोकाट कुत्र्यांची दहशत कशी असते, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.राजभवन परिसर असुरक्षितशहरात वर्षाला कुत्र्यांनी चावा घेण्याच्या आठ हजार घटना घडतात. यात अनेक जण गंभीर जखमी होतात. कुत्र्यांमुळे अपघात होऊन जखमी होणाºयांची संख्या याहून अधिक आहे. राजभवन हा सुरक्षित परिसर मानला जातो. परंतु मोकाट कुत्र्यांमुळे रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जाणाºयांसाठी हा परिसर सुरक्षित नाही. काटोल रोड, गिट्टीखदान पोलीस स्टेशनचा परिसर, गोरेवाडा रोड, बोरगाव, जुना काटोल नाका, तेलंगखेडी तलाव, पांढराबोडी, मेडिकल परिसर, बैद्यनाथ चौक, इमामवाडा, मानेवाडा रोड, भांडेवाडी, ताजबाग, नारा, नारी, पारडी नाका, रिंगरोड नरेंद्रनगर, उदयनगर, दिघोरी, सक्करदरा, कामठी रोड, हिंगणा रोड, प्रतापनगर यासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्रीला मोकाट कुत्र्यांचा वावर असतो.विधानभवन परिसरात यंत्रणा; शहराचे काय?अधिवेशनासाठी आलेल्या मुंबईच्या पाहुण्यांना मोकाट कुत्र्यांचा त्रास होऊ नये यासाठी विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने विशेष पथक तैनात केले आहे. पण शहरातील नागरिकांना होणाºया त्रासाचे काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. विधानभवन परिसरासाठी विशेष पथक तैनात केले जाते. त्याच धर्तीवर शहराच्या विविध भागात पथक तैनात का केले जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मनपा प्रशासनाची बघ्याची भूमिकामोकाट कुत्र्यांना आळा घालण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. याची जाणीव महापालिका प्रशासनालाही आहे. मात्र मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही. बेवारस कुत्र्यांवर नसबंदी होण्याची गरज आहे. यासाठी दोन वर्षात अनेकदा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. परंतु नियोजनाचा अभाव, महापालिका प्रशासन व पदाधिकाºयांनी बघ्याची भूमिका यामुळे मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून आपली सुटका कोण करणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.जखमींची जबाबदारी घेणार का?कुत्र्यांवरील नसबंदीसाठी कालावधी निश्चित करण्याची गरज आहे. चार ते पाच वर्षात ही प्रक्रिया पूर्ण करावयाची असेल तर दररोज १२५ ते १५० च्या आसपास शस्त्रक्रिया होण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा महापालिकेने उपलब्ध करण्याची गरज आहे. शहरातील चार भागात केंद्र सुरू करावे. नसबंदी केंद्रात सर्व सुविधा असाव्यात. प्रशिक्षित पशुवैद्यकीय अधिकारी असावेत. तरच हा उपक्रम यशस्वी होईल. परंतु महापालिक ा प्रशासनाकडे तूर्त असा प्रस्ताव नाही. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त होईपर्यंत महापालिका कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची जबाबदारी घेणार आहे का, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

 

टॅग्स :dogकुत्राnagpurनागपूर