लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा खरा अनुभव आता नागपूरकर घेत आहेत. गुरुवारी अवकाळी पाऊस झाला अन् शहरावर धुक्याची चादर पसरली. परिणामी, दिवसाच्या तापमानातही घट झाली. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण नसले तरी रात्रीचे तापमान घटले. ढगाळ वातावरण हटल्यामुळे दिवसभर थंडगार वारे वाहत होते. शुक्रवारी किमान तापमानात १२.६ डिग्रीची नोंद झाली. २४ तासात पारा ८ डिग्रीने घसरल्याची नोंद हवामान खात्याने केली.हवामान खात्याच्या म्हणण्यानुुसार ढगाळ वातावरण नाहीसे झाल्याने हवेच्या प्रवाहात बदल झाला. त्यामुळे हवेत गारवा वाढला आहे. सध्या वातावरणात इतकी थंडी आहे की, डिसेंबर महिन्याच्या उरलेल्या दिवसात अशीच अवस्था राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पारा १० डिग्रीच्या खाली जाण्याची शक्यता आहे. पण शुक्रवारी दिवसा गार वाऱ्यांमुळे बहुतेकांनी घराबाहेर पडताना गरम कपडे घातले होते. सायंकाळच्या सुमारास गारठा आणखी वाढला होता. रात्री घराबाहेर पडणे कठीण झाले होते.
नागपूरकर गारठले ! ढग हटले, पारा घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:17 AM
हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा खरा अनुभव आता नागपूरकर घेत आहेत. गुरुवारी अवकाळी पाऊस झाला अन् शहरावर धुक्याची चादर पसरली. परिणामी, दिवसाच्या तापमानातही घट झाली.
ठळक मुद्दे२४ तासात तापमानात ८ अंश तापमानाची घट