शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आंतरराष्ट्रीय मेडिकल हब होण्याची नागपुरात क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 1:41 AM

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त दरात उपचार होतात. त्यामुळे या क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्री : ‘इंडो-यूके इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेडिसिटी’च्या कोनशिलेचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोग्यसेवेच्या क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त दरात उपचार होतात. त्यामुळे या क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी आहेत. नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता, या शहरात आंतरराष्ट्रीय मेडिकल हब होण्याची पूर्ण क्षमता आहे. विशेष म्हणजे येत्या काळात येथे ‘मेडिकल टुरिझम’ वाढीस लागले, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देशातील पहिल्या ‘इंडो-यूके इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेडिसिटी’च्या कोनशिलेचे रविवारी अनावरण करण्यात आले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला खा.अजय संचेती, खा.कृपाल तुमाने, आ.सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.आशिष देशमुख, आ.प्रकाश गजभिये, महापौर नंदा जिचकार, ‘एमएडीसी’चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, ‘इंडो-यूके इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेडिसिटी’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय राजन गुप्ता, ब्रिटिश उच्चायुक्तामधील व्यापार, वित्त विभागाच्या उपसंचालिका जेन ग्रेडी, ईआन वॉटसन, मार्क हिचमॅन प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी यासंदर्भात ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत करार केला होता. त्याअंतर्गत देशात ११ ‘मेडिसिटी’ स्थापन होणार आहेत. यातील पहिल्या ‘मेडिसिटी’च्या स्थापनेचा मान नागपूरला मिळाला आहे. नागपूर ही व्याघ्र राजधानी आहे. अशास्थितीत येथे उपचार घ्यायला येणाºया विदेशी रुग्णांना नैसर्गिक पर्यटनाचादेखील आनंद घेता येईल. २०१९ पर्यंत ‘मेडिसिटी’चा पहिला टप्पा पूर्ण होईल, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पाच्या माध्यमातून ब्रिटनमधील तज्ज्ञ, संशोधक नागपुरात येतील. यामुळे येथील आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल शिवाय दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील, असे प्रतिपादन जेन ग्रेडी यांनी केले. डॉ.अजय राजन गुप्ता यांना प्रास्ताविक केले. यावेळी दीपक डागा यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.दोन लाख लोकांना रोजगार मिळणार‘मिहान-सेझ’मधील १५२.७२ एकर जमिनीवर उभा होणारा ‘इंडो-युके इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेडिसिटी’चा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण होणार असून याला सात ते नऊ वर्षे लागतील. पूर्ण प्रकल्पात इस्पितळ, महाविद्यालय, हॉटेल, रिटेल इत्यादींचा समावेश आहे. पहिला टप्पा २०१९ पर्यंत पूर्ण होईल व केवळ इस्पितळाच्या माध्यमातून सुमारे तीन हजार रोजगार निर्माण होणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दोन लाख लोकांना रोजगार मिळेल, असा दावा डॉ.अजय राजन गुप्ता यांनी कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रपरिषदेत केला.