कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत संचार निगम लिमिटेडने(बीएसएनएल) सात दिवसात वीज बिलाची थकबाकी न भरल्यास कंपनीचा टेलिफोन एक्स्चेंज व मोबाईल टॉवरचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. यामुळे विभागातील अनेक भागात टेलिफोनच्या घंटीसोबतच इंटरनेट सेवा बंद होईल. मोबाईल सेवासुद्धा प्रभावित होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे बीएसएनएलने अनेक महिन्यांपासून वीज बिल भरलेले नाही. महावितरणतर्फे नोटीस बजावल्यानंतरही वीज बिल भरले नाही. त्यामुळे महावितरणने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान व गोंदिया टेलिफोन एक्स्चेंजची वीज खंडित करण्यात आली आहे. तसेच डझनभर टॉवरचा वीज पुरवठा बंद केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून यावरील टेलिफान व इंटरनेट सेवा ठप्प आहे. मोबाईल सेवेवरही परिणाम झाला आहे. महावितरणची कारवाईची भूमिका विचारात घेता बीएसएनएलचे पीजीएम ए.के.वाजपेयी, डीजीएम माधुरी निमजे यांनी राज्याचे ऊ र्जामंत्री चंदशेखर बावनकुळे यांची भेट घेऊ न दिलासा देण्याची मागणी केली आहे. ऊर्जा मंत्र्यांच्या निर्देशानुसार मंगळवारी मुंबईत महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.महावितरणने सर्व जोडण्यांना पूर्ववत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. परंतु बीएसएनएलने सात दिवसात बँक वॉरंटी वा पोस्ट डेटेड धनादेश दिले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्यात येईल. ठरल्याप्रमाणे घडले नाही तर मुख्यालयाची परवानगी न घेताच वीज पुरवठा खंडित करतील.
आर्थिक संकटामुळे उद्भवली परिस्थितीबीएसएनएलच्या दूरसंचार विभागाचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत जोडण्याची विनंती केली आहे. कंपनी वीज बिल भरण्यास कटिबद्ध आहे. आर्थिक संकटामुळे बिल भरण्याला विलंब झाला आहे. बीएसएनएल सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशनला टेलिफोन सेवेसोबतच इंटरनेट सेवा उपलब्ध करते. वीज पुरवठा बंद केल्यास सर्वसामान्य माणसांना याचा त्रास होईल, असे या पत्रात नमूद केले आहे.
विदर्भात ६८ लाखांची थकबाकीविदर्भात बीएसएनएलचे २५२ वीज कनेक्शन आहेत. याच्या वीज बिलाची ६८ लाखांची थकबाकी आहे. यात टेलिफोन एक्स्चेंज व मोबाईल टॉवरला वीज पुरवठा होणाºया कनेक्शनचा समावेश आहे. सात दिवसात बिलाचा भरणा केला नाही तर याचा वीज पुरवठा खंडित केला जाईल. महावितरणसोबतच वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलचीही थकबाकी आहे. एसएनडीएलच्या माहितीनुसार बीएसएनएलचे ४९ कनेक्शन आहेत. यावर ४६,५८,३४७ थकबाकी आहे. यात बीएसएनएलच्या ३६ टॉवरवर १७,९५,८९७ रुपये, ६ एचटी कनेक्शनवर २६,४८,३३६ रुपये व सात टेलिफोन कनेक्शनवर २,१४,११४ रुपये थकबाकी आहे.