शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

पटेलांकडे नागपूरचा प्रभार

By admin | Published: July 04, 2016 2:40 AM

देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आता नागपूर शहर व ग्रामीणचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कार्यकर्ते प्रफुल्लित : राजकीय अनुभवाचा फायदा होणार, गटबाजीवर अंकुशनागपूर : देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आता नागपूर शहर व ग्रामीणचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पटेल यांना नागपूरच्या राजकारणाचा तगडा अभ्यास आहे. राजकीय खेळीतही पटेल माहीर मानले जातात. आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पटेल यांचा पक्षाला फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची नागपूरचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वळसे पाटलांना नागपुरात सातत्याने येणे सोयीचे नव्हते; शिवाय प्रफुल्ल पटेल यांचा नागपूरशी सातत्याने संपर्क आहे. पटेल यांच्यासारख्या वजनदार नेत्यावर नागपूरची जबाबदारी सोपविली तर त्याचा निश्चितच पक्षाला फायदा होईल, असा विचार मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत मांडण्यात आला व पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गटबाजीला खतपाणी न घालणारे व कार्यकर्त्यांना न्याय देणारे नेते म्हणून पटेल यांची ओळख आहे. नागपुरात अनिल देशमुख व रमेश बंग यांच्यात गटबाजी होती. त्यावर उपाय म्हणून दोन्ही नेत्यांना शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपवावी, हा फॉर्म्युला पटेल यांचाच होता, असे पक्षात बोलले जाते. पटेल यांचे शरद पवार यांच्याशी असलेले संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे पटेलांच्या नियंत्रणाखाली आता पक्षात कुणी गटबाजीला खतपाणी घालण्याचे धाडस करणार नाही, एवढे मात्र नक्की. नागपूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे तेवढी सक्षम नाही. अनिल देशमुख यांनी काटोलमध्ये तर रमेश बंग यांनी हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी जोपासली. पण इतर मतदारसंघात घड्याळाची टीकटीक बंद आहे. नागपूर महापालिकेतही राष्ट्रवादीची तीच स्थिती आहे. दुहेरी आकडाही राष्ट्रवादीला गाठता आलेला नाही. काही माजी नगरसेवक काँग्रेसवासी झाले आहेत, तर विद्यमान नगरसेवकांपैकी काहींनी तर भाजपवासी होण्याची तयारी चालविली आहे. मात्र, आता पटेल यांच्या एन्ट्रीने आऊटगोर्इंग थांबेल. आगामी निवडणुकीत पटेल हे पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकदीने उभे राहतील व याचा फायदा राष्ट्रवादीला होईल, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.(प्रतिनिधी)भंडारा-गोंदियाचाही प्रभारभंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांचा प्रभार यापूर्वी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता देशमुख यांच्याकडे अकोला आणि गडचिरोलीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पटेल यांच्याकडे भंडारा व गोंदिया हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हे सोपविण्यात आले आहेत.