शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

स्वप्नातील घर खरेदीसाठी नागपूरकरांची गर्दी

By admin | Published: October 17, 2015 3:13 AM

नागपुरात घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी क्रेडाईच्या वतीने सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली...

‘क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो’: ग्राहकांची ‘साईट व्हिजिट’साठी नोंदणीनागपूर : नागपुरात घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी क्रेडाईच्या वतीने सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली असून शहराच्या विविध भागात असलेल्या विविध योजनांची माहिती राणी कोठी येथे आयोजित क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. यामुळे आपल्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी नागपूरकर मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देत असून अनेक ग्राहकांनी ‘साईट व्हिजिट’साठी नोंदणी केली आहे.क्रेडाईच्या वतीने राणी कोठी येथे १५ ते १८ आॅक्टोबरदरम्यान क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन केले आहे. यात स्पॉट फायनान्स, नागपुरातील सर्व प्रॉपर्टी एकाच छताखाली पाहण्याची संधी उपलब्ध झाली असल्यामुळे प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरकरांनी एकच गर्दी केल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी दिली. एक्स्पोला एका दिवसात पाच हजार नागरिक येण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. एक्स्पोमध्ये क्रेडाईचे सदस्य असलेल्या बिल्डर्सचे रो हाऊसेस, फ्लॅट, बंगलो उपलब्ध आहेत. प्रदर्शनाला भेट देऊन दुसऱ्या दिवशी असंख्य नागरिकांनी त्यांना आवड असलेल्या घराची माहिती विविध स्टॉल्सला भेट देऊन घेतली. सध्या सणासुदीचे दिवस असून नागरिक घर खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. यात नोकरदार मंडळी सायंकाळी कार्यालयातून घरी परतल्यानंतर कुटुंबासह प्रदर्शनाला भेट देत आहेत. एक्स्पोमध्ये स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक आदी बँकांचे स्टॉल्स उपलब्ध आहेत. प्रदर्शनात अनेक नागरिकांनी भेट देऊन घर खरेदीसाठी चौकशी केल्याची माहिती पिरॅमिड मेगा सिटी या बेसा येथील प्रकल्पाचे विपणन प्रमुख संजय गोसावी यांनी दिली. तर अनेक नागरिकांनी साईट व्हिजिटसाठी आपल्या नावाची नोंदणी केल्याची माहिती पिपळा रोडवरील अथर्व नगरीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मनोज सुरमवार यांनी दिली. सध्या नागरिक फ्लॅटपेक्षा बंगल्यांच्या स्कीमला पसंती देत असल्याचे हरीहर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक मनीष बधीयानी यांनी सांगितले. (वा. प्र.)