शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

नागपूरचे हृदय मुंबईला : मेडिकलमध्ये तिसरे ऑर्गन रिट्रायव्हल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 9:01 PM

अपघातामुळे ब्रेन डेड झालेल्या ३३ वर्षीय नागपूरच्या युवकाचे हृदय मुंबईला तर फुफ्फुस सिकंदराबादमधील रुग्णालयात पाठविण्यात आले. तरुण मुलगा गेल्याच्या दु:खातही नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेतल्यामुळेच पाच रुग्णांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हे तिसरे ‘आर्गन रिट्रायव्हल’ म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून अवयव काढण्याची प्रक्रिया व त्याचवेळी अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली.

ठळक मुद्देफुफ्फुस गेले सिकंदराबादला : पाच रुग्णांना जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघातामुळे ब्रेन डेड झालेल्या ३३ वर्षीय नागपूरच्या युवकाचे हृदय मुंबईला तर फुफ्फुस सिकंदराबादमधील रुग्णालयात पाठविण्यात आले. तरुण मुलगा गेल्याच्या दु:खातही नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेतल्यामुळेच पाच रुग्णांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हे तिसरे ‘आर्गन रिट्रायव्हल’ म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून अवयव काढण्याची प्रक्रिया व त्याचवेळी अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली.राजेश संतोष साहू (३३) रा. त्रिमूर्ती नगर, भामटी असे अवयवदात्याचे नाव.राजेश व्यवसायाने चालक आहे. १२ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घरासमोरील रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात असलेल्या एका वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. वाहन चालक न थांबताच पळूनही गेला. लोकांनी त्याला तातडीने मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. मेंदूला जबर मार बसला होता. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, परंतु १४ फेब्रुवारी रोजी राजेशचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. राजेश हा एकुलता एक मुलगा. त्याच्यावरच घराची जबाबदारी होती. अचानक झालेल्या या घटनेने साहू कुटुंबाला जबर धक्का बसला. परंतु त्या स्थितीतही संयम दाखवित कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी लागलीच यंत्रणा हालवली. ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’ला (झेडटीसीसी) याची माहिती दिली. समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात मूत्रपिंड समितीच्या अध्यक्ष डॉ. चारुलता बावनकुळे, यकृत समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर टॉमी व नागपूर झोन कोऑर्डीनेटर वीणा वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पार पाडली.मेडिकल ते विमानतळ ग्रीन कॉरीडोरट्रॉमा केअर सेंटरमध्ये शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ‘रिट्रायव्हल’ला सुरुवात झाली. मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या चमूने हृदय, तर सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या चमूने फुफ्फुस शितपेटीत ठेवून रुग्णवाहिकेमधून ग्रीन कॉरीडोरच्या मदतीने काही मिनिटांच्या आत विमानतळ गाठले. येथून विशेष विमानाने ते मुंबई व सिकंदराबाद येथे पोहचले. नागपुरातून हृदय जाण्याची हे चौथी घटना आहे. यकृत लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलला तर एक मूत्रपिंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर एक मूत्रपिंड वोक्हार्ट हॉस्पिटलमधील रुग्णांना देण्यात आले. मेडिकलच्या नेत्रपेढीला नेत्रदान करण्यात आले.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयOrgan donationअवयव दान