शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

निसर्गसौंदर्याने नटलेले नागपूरचे ऐतिहासिक ‘राजभवन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:03 AM

उपराजधानीच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले आणखी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे राजभवन. शहराच्या मध्यभागी सेमिनरी हिल्सच्या हिरव्यागार कुशीत निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले राजभवन म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल अशा व्हीव्हीआयपी लोकांच्या निवासाचे स्थान. म्हणूनच त्याला ‘गव्हर्नर कुटी’ म्हणूनही ओळखले जाते. १२० वर्षापेक्षा अधिक काळाचा ऐतिहासिक वारसा लाभलेली राजभवनची वास्तू स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे साक्षीदार राहिले आहे.

ठळक मुद्देब्रिटिश व भारतीय वास्तुशैलीचा संगम : १२० पेक्षा अधिक वर्षाचा वारसा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले आणखी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे राजभवन. शहराच्या मध्यभागी सेमिनरी हिल्सच्या हिरव्यागार कुशीत निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले राजभवन म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल अशा व्हीव्हीआयपी लोकांच्या निवासाचे स्थान. म्हणूनच त्याला ‘गव्हर्नर कुटी’ म्हणूनही ओळखले जाते. १२० वर्षापेक्षा अधिक काळाचा ऐतिहासिक वारसा लाभलेली राजभवनची वास्तू स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे साक्षीदार राहिले आहे.राजभवन सुरुवातीला मध्य प्रांताच्या कमिश्नरचे निवासस्थान होते. कालांतराने ते मध्य प्रांत व वऱ्हाडच्या गव्हर्नरचे निवासस्थान झाले. स्वातंत्र्यानंतर तेच जुन्या मध्यप्रदेशच्या राज्यपालांचे निवासस्थान होते व महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर हेच राजभवन राज्यातील राजभवनांपैकी एक झाले. सन १९०० पूर्वी नागपूरच्या राजभवनची इमारत बांधण्यास दोन ते तीन वर्षाचा कलावधी लागल्याचे सांगण्यात येते. मध्यप्रांताचे मुख्य कमिश्नर ए. पी. मॅकडोनाल्ड हे या देखण्या इमारतीतील सर्वप्रथम निवासी होते. हे निवासस्थान कालांतराने मध्यप्रांताच्या गव्हर्नरचे गव्हर्नमेंट हाऊस म्हणून नावारुपास आले. या वास्तूने ब्रिटिश आणि भारतीय अशा वेगवेगळ्या संस्कृती जवळून पाहिल्याने तिच्या रचनेमध्ये वेगवेगळ्या वास्तुशैलीचा संगम पहावयास मिळतो. नक्षीदार कमानी, व्हरांडा, त्यातून दिसणारी बॉल रूम, मुख्य दिवाणखाना व भव्य असे भोजनकक्ष पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. नक्षीदार पर्शियन गालिचा वैभवशाली काळाची आठवण देतो. येथे येणारा प्रत्येक अतिथी स्वच्छ, सुंदर व वर्तुळाकार हिरवेगार लॉन बघून थक्क होतो. जुन्या काळातील बांधकाम असलेली भव्यदिव्य देखणी वास्तू पाहून प्रत्येकजण विस्मित होतो. या राजभवनात सुबक व कलात्मक वस्तूंचा संग्रह आहे. कोरीव लाकडी फर्निचर, क्रॉकरी, भोसले घराण्यातील राजांची व्यक्तिचित्रे, औरंगजेबाच्या काळातील असीरगड किल्ल्यावरील अष्टधातूंची भव्य तोफ, १६ व्या शतकातील गोंडराजाचे शिल्प, १३ व्या शतकातील जबलपूर येथील उत्खननात सापडलेले भगवान महावीरांचे शिल्प तसेच विविध शिल्पे व पुरातन वस्तू नकळतच गतकाळाच्या वैभवात घेऊन जातात.राजभवन घनदाट वनराईमध्ये एका पठारावर वसविलेले आहे. म्हणूनच फळे, फुले व पक्ष्यांनी बहरलेले आहे. २०११ साली राजभवनचे मुख्य अधिकारी रमेश येवले यांच्या पुढाकाराने येथील ७० एकरामध्ये जैवविविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली. शेकडो वृक्षवेली, गुलाबांच्या अनेक प्रजाती, सुगंधी वनस्पती, वनौषधी, अलंकारिक बांबू, निवडुंब, सागवान, आंबा, डाळिंब अशा हजारच्यावर प्रजातींचे वृक्ष येथे बहरले आहेत.स्वतंत्र फुलपाखरू उद्यानही आहे. विशेष म्हणजे संपूर्ण राजभवन परिसरात ५० पेक्षा अधिक मोरांचा मुक्त वावर असून, १४० पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी अशा माजी  राष्ट्रपतींसह वर्तमान  राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान व राज्यपालांचेही वास्तव्य येथे झाले आहे. असे हे राजभवन सर्वांगाने सुंदर, अप्रतिम आणि राजकीय दृष्टीनेही ऐतिहासिक आहे.

टॅग्स :nagpurनागपूर