शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपुरात महावितरण झुकले ‘आम आदमी’ पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:17 PM

उद्योगांवर कोट्यवधी रुपयांचे वीज बिल थकीत असतानाही सरकारकडून त्यांना सवलत दिली जाते. दुसरीकडे सामान्य माणसाची वीज बिल भरल्याची पावती महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करून न दिल्याने वीज कापली जाते. याच कारणावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एका वृद्धाच्या घरची वीज कापली. परंतु त्या वृद्धाने महावितरणच्या अधिकाऱ्याला असा धडा शिकविला की अधिकारी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले आणि वृद्धाच्या घरचे कनेक्शन पूर्ववत करण्यात आले.

ठळक मुद्देबिल भरल्यानंतरही कापली वीज : वृद्धाचा तर्क नडला अधिकाऱ्याला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्योगांवर कोट्यवधी रुपयांचे वीज बिल थकीत असतानाही सरकारकडून त्यांना सवलत दिली जाते. दुसरीकडे सामान्य माणसाची वीज बिल भरल्याची पावती महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करून न दिल्याने वीज कापली जाते. याच कारणावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एका वृद्धाच्या घरची वीज कापली. परंतु त्या वृद्धाने महावितरणच्या अधिकाऱ्याला असा धडा शिकविला की अधिकारी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले आणि वृद्धाच्या घरचे कनेक्शन पूर्ववत करण्यात आले.बजाजनगर येथे राहणाऱ्या एका वृद्धाच्या घरी काही दिवसापूर्वी महावितरणचे दोन कर्मचारी पोहचले. या कर्मचाऱ्यांनी त्यांना कळविले की, तुमचे वीज बिल थकीत आहे. त्यामुळे तुमचे कनेक्शन कापायचे आहे. वृद्धाने त्यांना सांगितले की माझ्या वीज बिलाची अंतिम तिथी २० होती. परंतु मुलाने २४ तारखेलाच वीज बिल भरले आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बिल भरल्याची पावती मागितली. घरात शोधाशोध केल्यानंतरही त्यांना पावती मिळाली नाही. त्यामुळे वृद्धाने कर्मचाऱ्यांना विनंती केली की, उद्या या, तुम्हाला पावती दाखवितो. विनंतीला मान देऊन महावितरणचे कर्मचारीही परतले.परंतु दुसऱ्याच दिवशी कर्मचारी परत घरी पोहचले. परंतु ते आपल्या मुलाकडून पावती घेणे विसरले होते आणि मुलगा कार्यालयात गेला होता. त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुलाच्या मोबाईलवर संपर्क करण्यास सांगितले. मुलाशी संपर्क होऊ न शकल्याने, कर्मचारी वीज कापण्यास अडून बसले. वृद्धानी त्यांना काही वेळानंतर या, अशी विनंती केली, परंतु कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विनंतीला दुजोरा दिला नाही. १२८० रुपयांचे वीज बिल भरल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी वृद्धाचे काहीच न ऐकता कनेक्शन कापून घेतले.रात्री मुलगा आल्यानंतर त्यांनी मुलाकडून बिल भरल्याची पावती घेतली. रात्र कशीबशी अंधारात घालवल्यानंतर, दुसऱ्या दिवशी ती वृद्ध व्यक्ती आपल्या परिचितासोबत महावितरणच्या कार्यालयात पोहचली. क नेक्शन कापलेले कर्मचारी त्यांना दिसले. त्यांनी पावती दाखवून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची विनंती केली. परंतु कर्मचाऱ्यांनी सांगितले की, निर्धारित शुल्क भरल्याशिवाय कनेक्शन पूर्ववत करता येत नाही. निर्धारित शुल्क भरणार नसल्याने ती वृद्ध व्यक्ती अडून बसली. बिल भरले असल्यामुळे महावितरणने आपल्या रेकॉर्डमधून त्याची माहिती करून घेणे गरजेचे होते. परंतु कर्मचाऱ्यांनी तसे न करता वीज कापली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर