शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

उत्तराखंडमध्ये अडकलाय नागपूरचा मेकअपमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:29 PM

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे सारे जग जागच्या जागी थांबले आहे. कल्पनाविश्वात रममाण करून साऱ्यांना खिळवून ठेवणारे चित्रपट उद्योग क्षेत्रही लॉक झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होते. तेही रखडले आहे आणि चित्रिकरणात व्यस्त असलेली मंडळीही तिथेच अडकली आहे.

ठळक मुद्देनागपूरमध्ये परतण्यासाठी होतेय अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे सारे जग जागच्या जागी थांबले आहे. कल्पनाविश्वात रममाण करून साऱ्यांना खिळवून ठेवणारे चित्रपट उद्योग क्षेत्रही लॉक झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होते. तेही रखडले आहे आणि चित्रिकरणात व्यस्त असलेली मंडळीही तिथेच अडकली आहे. अशाच चित्रीकरणाच्या स्पॉटवर नागपूरचा रंगभूषाकार (मेकअपमॅन) अडकला आहे.रामजी व नकुल श्रीवास बंधू हे नागपुरातील प्रख्यात मेकअप आर्टिस्ट आहेत. नागपूरसह मुंबई व दक्षिण चित्रपट क्षेत्रातून त्यांची मागणी असते. शिवाय, मॉडेलिंगमध्येही मेकअपमॅन म्हणून त्यांना आवर्जुन बोलावले जात असते. या बंधंूपैकी लहान असलेले नकुल हे उत्तराखंड येथील बेरीनाग येथे अडकले आहेत. त्यांच्यासोबत चित्रपटातील तांत्रिक बाजू सांभाळणारे कलावंतही तेथेच आहेत. असे आठ-दहा जण बेरीनाग येथील एका लॉजवर एकाच रूममध्ये आहेत. विशेष म्हणजे निमार्ताही तेथेच असून, त्याच्याकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे ही संपूर्ण मंडळी सांगत आहे. त्यामुळे, या कलावंतांवर उपासमारीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही मंडळी आपापल्या भागातील सहकारी कलावंतांकडून मदत मागून येणारा दिवस काढत आहेत. नकुल यांच्यासह मुंबईची असलेले हे सारे कलावंत लवकरात लवकर आपल्या गृहनगरात परतण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, कुठूनही त्यांना मदत मिळत नसल्याचे दिसून येत आहे.७ मार्चपासून अडकलोय - नकुल श्रीवास: ७ मार्चपासून तमिळ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मेकअपमॅन म्हणून बेरीनाग येथे संपूर्ण क्रूसोबत आलो. काही दिवस चित्रिकरण सुरू असतानाच २२ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले. तेव्हापासून चित्रपटाचे दिग्दर्शक निशाद भारद्वाज व इतर कु्र मेंबर्ससोबत लॉजमध्ये अडकून पडलो आहोत. निर्माते सिद्धू पुजारी हे सुद्धा येथेच एका हॉटेलमध्ये आहेत. मात्र, ते कोणतही मदत करित नसल्याचे नकुल श्रीवास यांनी सांगितले. अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाकडूनही कुठलेही सहकार्य झाले नाही. चित्रपट मराठी नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही, असे त्यांचे म्हणने आहे. जवळचा पैसा संपला आहे. सगळेच क्रु मेंबर्स एकमेकांच्या आधाराने जगत आहेत. नागपुरातून संजय भाकरे, आसिफ बक्षी, दीपाली घोंगे, आसावरी रामेकर या सहकारी कलावंतांनी केलेल्या मदतीमुळे थोडा आधार प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस