लोकमत न्यूय नेटवर्क
नागपूर : शहरात लागोपाठ दुसऱ्या दिवशी तापमानामध्ये घट नोंदविण्यात आली आहे. मागील २४ तासात किमान तापमानात १ अंश घट नोंदविण्यात आली असून तापमान ११.५ अंश सेल्शिअस नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या वर्षातील हा सर्वाधिक थंडीचा दिवस ठरला आहे. पारा सामान्याहून ५ अंशाने घसरल्याने रात्रीच्या थंडीतही वाढ झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितपनुसार, तापमानामध्ये पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात यंदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.
चंद्रपुरात ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ८.२ अंशाची नोंद झाली असून विदर्भात चंद्रपूर सर्वाधिक थंड राहीले. यवतमाळमध्ये ९.५, गोंदीयात १०.५, अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भातील अन्य जिल्ह्यातही पारा बराच खालावलेला आहे.
नागपुरात दिवसाचे तापमानही घटले आहे. मागील २४ तासात किमान तापमान ०.५ अंश सेल्सिअसने घटून ३०.२ अंशावर पोहचले होते. सामान्यापेक्षा एक अंशाने तापमान खालावल्याने दिवसाही थंडी जाणवत होती.