शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

नागपूरच्या पारडीतील हत्याकांडाचा छडा : दोन आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 12:41 AM

पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ५ दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात पारडी पोलिसांनी यश मिळवले. मात्र आरोपींनी ज्याची हत्या केली त्या मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. तो कोण, कुठला हे शोधून काढण्यासाठी पोलीस शोधाशोध करत आहेत.

ठळक मुद्देमृताची ओळख पटेना : पोलिसांकडून शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ५ दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात पारडी पोलिसांनी यश मिळवले. मात्र आरोपींनी ज्याची हत्या केली त्या मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. तो कोण, कुठला हे शोधून काढण्यासाठी पोलीस शोधाशोध करत आहेत.२८ मेच्या सकाळी नागपूर-भंडारा मार्गावरील कापसी पुलाजवळ एका झाडाखाली अंदाजे २५ वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पारडी पोलिसांना मिळाली होती. ठाणेदार सुनील चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडे ओळख पटविणारे कोणतेही साधन नव्हते. त्याच्या डोक्यावर सिमेंटच्या विटेने मारून आरोपींनी त्याची हत्या केली असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी बाजूला पडलेल्या रक्तरंजित विटेवरून काढला होता. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मृत आणि मारेकऱ्यांचा शोध लावण्यासाठी प्रयत्न चालविले. तब्बल चार दिवस प्रयत्न केल्यानंतर ही घटना उघडकीस आल्याच्या पूर्वरात्रीला काहीजण घटनास्थळाजवळ दारू पीत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी आजूबाजूच्यांकडे चौकशी केली. आरोपी अमित ऊर्फ जल्या सहदेव कावडे (वय ३५, रा. नवरगाव रामटेक) आणि पुरुषोत्तम सुरजप्रसाद विश्वकर्मा (वय ३८, रा. प्रतापपूर सिहोरा, जी. जबलपूर, मध्यप्रदेश) हे दोघे त्या रात्री तिकडे दिसल्याचे पोलिसांना खबऱ्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी कावडे आणि विश्वकर्माचा शोध घेऊन त्यांना रविवारी ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांनी हत्येची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना हत्येच्या आरोपात अटक केली.तंबाखू आणि दारूने केला घातआरोपींनी गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, २७ मे च्या रात्री घटनास्थळी मृत तरुण दारू पीत बसून होता, तेथे आम्ही दोघे गेलो असता त्याने आम्हाला तंबाखू खायला मागितला. त्याबदल्यात दारूची अर्धी बाटली देण्याचे मान्य केले. तंबाखू खाल्ल्यानंतर मात्र त्याने दिलेली दारूची बाटली लगेच हिसकावून घेतली. त्यामुळे त्याच्यासोबत हाणामारी झाली. काही वेळेनंतर आरोपी तेथून निघून गेले आणि पुन्हा दारूची बाटली घेऊन तिथे परतले. ती दारू पिल्यानंतर या दोघांनी त्या तरुणासोबत वाद घातला. झटापट सुरू असताना एका आरोपीने मृताचे पाय पकडले तर दुसºयाने सिमेंटची वीट त्याच्या डोक्यात घालून त्याची हत्या केली. त्यानंतर हे दोघे पळून गेले. आरोपीच्या या कबुलीजबाबातून केवळ तंबाखू आणि दारूच्या अर्ध्या बाटलीसाठी हत्येसारखा गंभीर गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटक