शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपुरात रक्ताची टंचाई; रक्तपेढ्यांची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:03 AM

सध्याच्या स्थितीत मेडिकलमध्ये केवळ ४६, मेयोमध्ये १०७ तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १५५ रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. काही दिवस पुरेल एवढाच हा साठा असल्याने ‘रक्त देता का रक्त’ अशी आर्त हाक या रक्तपेढ्यांनी दिली आहे.

ठळक मुद्देमेयो, मेडिकल, डागामध्ये मोजकाच रक्तसाठा

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन रक्तदान केल्यास रक्ताची टंचाई कधीच पडणार नाही, हे माहीत असतानाही फार कमी लोक स्वत:हून समोर येतात. यातच उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची कमी झालेली संख्या व गैरसमजुतीमुळे रक्तदानाचा टक्का घसरतो. या वर्षी अशीच स्थिती निर्माण झाल्याने शासकीय रक्तपेढ्या अडचणीत आल्या आहेत. सध्याच्या स्थितीत मेडिकलमध्ये केवळ ४६, मेयोमध्ये १०७ तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १५५ रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. या तिन्ही रुग्णालयात प्रत्येकी रोज ३० ते ५० वर रक्तपिशव्यांची गरज असते. यामुळे काही दिवस पुरेल एवढाच हा साठा असल्याने ‘रक्त देता का रक्त’ अशी आर्त हाक या रक्तपेढ्यांनी दिली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी ४०० वर खासगी रूग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाहीतर छत्तीसगड, मध्य प्रदेशातून, तेलंगणा येथून रुग्णांचा ओढा नागपूरकडे वाढला आहे.यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चार शासकीयसह नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु सर्वच ठिकाणी जेमतेम रक्ताचा साठा उपलब्ध आहे.विशेषत: ‘निगेटीव्ह’ ग्रुपच्या रक्ताची चणचण आहे. काही रक्तपेढ्या ‘निगेटीव्ह’ ग्रुपचा रक्तदाता उपलब्ध करून देण्याच्या अटीवरच या ग्रुपचे रक्त दिले जात असल्याची माहिती आहे. इतर ग्रुपमध्ये ‘एबी’, ‘ओ’ व ‘बी’ पॉझिटीव्ह रक्ताचा साठाही जेमतेम असल्याची माहिती आहे.

मेडिकलमध्ये केवळ ४६ रक्तपिशव्यामेडिकलमध्ये रोज ५०वर रक्तपिशव्यांची गरज भासते, परंतु सध्याच्या स्थितीत केवळ ४६ रक्तपिशव्या उपलब्ध असल्याची माहिती आहे. यातही ‘ए निगेटिव्ह’च्या तीन, ‘बी पॉझिटीव्ह’च्या आठ, ‘बी निगेटिव्ह’च्या चार व ‘ओ निगेटिव्हच्या केवळ तीन रक्तपिशव्या शिल्लक आहेत. मेयोमध्येही ‘ए, ‘ओ’, ‘एबी’ या रक्त गटातील ‘पॉझिटिव्ह’ व ‘निगेटिव्ह’च्या प्रत्येकी तीन-चार रक्तपिशव्याच आहेत. डागामध्ये याहून कठीण स्थिती असल्याचे समजते. त्यातुलनेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये परिस्थती सामान्य आहे. येथे १५५ रक्तपिशव्या आहेत.

स्वयंस्फूर्तीने रक्तदान कराशहरात विदर्भच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्या रक्ताची निकड भागविण्याची जबाबदारी रक्तपेढ्यांवर आली आहे. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक रक्तसाठा उपलब्ध होत नाही. उन्हाळ्यात महाविद्यालयांना सुट्या, लग्नसराई यामुळे रक्तदान शिबिरे कमी होत असल्याने याचाही फटका बसतो. रक्त ही एक अशी गोष्ट आहे ज्यासाठी मनुष्यावरच अवलंबून रहावे लागते. कुणीतरी रक्तदान शिबिर आयोजित करेल व आपण रक्तदान करू अशी प्रतीक्षा न करता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने समोर येऊन रक्तदान करावे.-डॉ. संजय पराते, विभाग प्रमुख, रक्तपेढी मेडिकल

मागणी हजाराची, मिळतात ३०० पिशव्याउन्हाळी सुट्या असल्याने अनेक रक्तदाते बाहेरगावी जातात. या दिवसांत रक्तदान शिबिरे कमी झालेली असतात. उन्हाळ्यात रक्तदान केल्याने शरीराला नुकसान होईल किंवा बाहेर पडल्यावर लगेच चक्कर येईल अशा प्रकारचे गैरसमज असल्याने अनेक जण रक्तदान करण्यास कचरतात. याचा फटका रक्तपेढ्यांना व रुग्णांना बसतो. शहरात साधारण एक हजार रक्तपिशव्यांची मागणी असताना स्वत:हून रक्तदान करणाऱ्यांकडून किंवा रुग्णांच्या नातेवाईकांकडून दिवसाकाठी २००-३०० रक्तपिशव्यांचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Healthआरोग्य