शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

नागपूरचे शुद्धोदन सांभाळणार दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 9:04 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या उपक्युरेटरपदी शुद्धोदन वानखेडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते मूळचे नागपूरचे आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या डॉ.आंबेडकर फाऊंडेशनअंतर्गत येथील १५ जनपथ रोडवर उभारण्यात आलेल्या भव्य डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या उपक्युरेटरपदी वानखेडे यांची प्रतिनीयुक्ती तत्त्वावर नेमणूक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देउपक्युरेटरपदी शुद्धोदन वानखेडे यांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या उपक्युरेटरपदी शुद्धोदन वानखेडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते मूळचे नागपूरचे आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या डॉ.आंबेडकर फाऊंडेशनअंतर्गत येथील १५ जनपथ रोडवर उभारण्यात आलेल्या भव्य डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या उपक्युरेटरपदी वानखेडे यांची प्रतिनीयुक्ती तत्त्वावर नेमणूक करण्यात आली आहे.वानखेडे हे केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयात १९९१ पासून आर्टिस्ट पदावर कार्यरत आहेत. त्यांनी नागपूर येथील शासकीय चित्रकला महाविद्यालयातून चित्रकलेची पदवी संपादन केली आहे. पुढे मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील योहानी येथील नवोदय विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून ते कार्यरत होते. आदिवासी विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे.वानखेडे हे विविध निमंत्रण पत्राचे डिझाईन करतात, वृत्तपत्रांमध्येही त्यांनी विविध कलात्मक कामे केली आहेत. त्यांनी तयार केलेले माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्यावरील ‘मॅन आॅफ द मिलेनियम’ हे कॅरीकेचर विशेष गाजले होते. ‘अजिंठा भित्तीचित्रातील अलंकारिक रेषा’ या विषयांवर त्यांनी लघुशोध प्रबंध सादर केला आहे. दिल्लीस्थित आॅल इंडिया सिद्धार्थ वेल्फेअर सोसायटीचे सामाजिक सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरnagpurनागपूर