लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील प्रसिद्ध व्यवस्थापन संस्थेच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या कॉमन अॅडमिशन टेस्ट (कॅट) मध्ये नागपूरचा सोमांश संजीव चोरडिया याने १०० पर्सेंटाईल मिळवित देशात टॉप केले आहे. सोमांश हे लोकमत परिवाराचे सदस्य संजीव चोरडिया यांचे सुपुत्र आहेत. सोमांश सध्या आयआयटी मुंबईमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. कॅटचा निकाल शनिवारी घोषित झाला. यात सोमांशला १०० पर्सेंटाईल तर त्याचा जिवलग मित्र राहुल मांगलिक याने कॅटमध्ये ९९.९९ पर्सेंटाईल मिळविले आहे. राहुल हा मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे. सोमांश व राहुलने सोबतच कॅटची तयारी सुरू केली होती. पहिल्याच प्रयत्नात सोमांश व राहुलने उल्लेखनीय यश संपादन केले. सोमांश म्हणाले की आम्ही दोघांनी जानेवारी महिन्यात आयआयएम मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कॅटची तयारी सुरू केली होती.
कॅटमध्ये नागपूरचा सोमांश चोरडिया देशात टॉपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 12:34 AM
देशातील प्रसिद्ध व्यवस्थापन संस्थेच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या कॉमन अॅडमिशन टेस्ट (कॅट) मध्ये नागपूरचा सोमांश संजीव चोरडिया याने १०० पर्सेंटाईल मिळवित देशात टॉप केले आहे.
ठळक मुद्देमिळविले १०० पर्सेंटाईल