लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपने शुक्रवारी जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत नागपूर जिल्ह्याला लक्षणीय स्थान मिळाले आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महामंत्रिपदाची जबाबदारी तर आहेच शिवाय अॅड.धर्मपाल मेश्राम व अर्चना डेहनकर यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. याशिवाय प्रदेश कार्यसमितीतील राज्यभरापैकी आठ टक्के निमंत्रित सदस्य नागपूर जिल्ह्यातीलच आहेत.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या यादीत विविध १८ ‘सेल’च्या पदाधिकाऱ्यांची नावेदेखील आहेत. यातील पाच ‘सेल’मध्ये नागपूर जिल्ह्यातील पाच पदाधिकाऱ्यांची संयोजक-सहसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे. यात संजय भेंडे (सहकार सेल), कल्पना पांडे (शिक्षण सेल), मिलिंद कानडे (आर्थिक सेल), शाम चांदेकर (विणकर सेल), जयसिंग चव्हाण (दिव्यांग सेल) यांचा समावेश आहे. संजय फांजे यांच्याकडे प्रदेश कार्यालय सहमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.याशिवाय प्रदेशाध्यक्षांनी प्रदेश कार्यसमिती तसेच प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्यांचीदेखील यादी जाहीर केली. यात अनुक्रमे जिल्ह्यातील पाच व अकरा सदस्यांचा समावेश आहे. प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी राज्यमंत्री परिणय फुके, माजी खासदार दत्ता मेघे व माया इवनाते यांची नावे आहेत.प्रदेश कार्यसमिती सदस्यडॉ.रामदास आंबटकर, अनिल सोले, नंदा जिचकार, डॉ.मिलिंद माने, डॉ. राजीव पोतदारप्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्यसुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, नाना शामकुळे, श्रीकांत देशपांडे, अरविंद शहापूरकर, रमेश मानकर, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर दिवे, राजीव हडप, सुधीर पारवे, ओमप्रकाश (मुन्ना) यादव
भाजपच्या ‘जम्बो’ कार्यकारिणीत नागपूरचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 10:01 PM
भाजपने शुक्रवारी जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत नागपूर जिल्ह्याला लक्षणीय स्थान मिळाले आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महामंत्रिपदाची जबाबदारी तर आहेच शिवाय अॅड.धर्मपाल मेश्राम व अर्चना डेहनकर यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.
ठळक मुद्देप्रदेश कार्यसमितीतील आठ टक्के निमंत्रित सदस्य जिल्ह्यातील : मंत्रिपदी शहरातील दोन चेहरे